Thursday, September 19, 2024
Homeनगरभंडारदरातून विसर्ग वाढला; मुळा नदीतही पाणी वाढले

भंडारदरातून विसर्ग वाढला; मुळा नदीतही पाणी वाढले

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

भंडारदरा आणि मुळा पाणलोटात काल गुरूवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. त्यामुळे भंडारदरा 11039 दलघफू क्षमतेने पूर्ण भरले असून या धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून 4310 क्युसेकने तर निळवंडेतून 4461 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. काल सकाळी नोंदवल्या गेलेल्या आकडेवारीनुसार घाटघरमध्ये 75 तर रतनवाडीत 48 मिमी पावसाची नोंद झाली. काल दिवसभरात पडलेल्या भंडारदरातील नोंद 20 मिमी झाली आहे. या पावसामुळे गत 24 तासांत धरणात 174 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने विसर्ग वाढविण्यात आला.

हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनईतही पावसाचा जोर वाढल्याने कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग वाढला असून तो काल सायंकाळी 3822 क्युसेक होता. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात पाणीसाठा 25042 दलघफू आहे. धरणातून 500 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पाऊस कोसळत असल्याने या दोन्ही धरणांच्या पाणलोटातील पिके धोक्यात येण्याची शक्यता असल्याने या भागातील शेतकरी धास्तावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या