Wednesday, October 9, 2024
Homeनगरभंडारदरात 70 दलघफू पाण्याची आवक

भंडारदरात 70 दलघफू पाण्याची आवक

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या पांजरे आणि घाटघरमध्ये अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने धरणात नव्याने पाणी येत आहे. गत सायंकाळी संपलेल्या 24 तासांत 70 दलघफू पाणी दाखल झाले आहे.

- Advertisement -

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात 1229 दलघफू (11.13 टक्के)पाणीसाठा झाला होता. आतापर्यंत धरणात 184 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. तीन चार दिवस पाऊस गायब झाल्यानंतर मान्सून शनिवारी रविवारी सक्रिय झाला होता. शनिवारी भंडारदरात 17 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी 23 मिमी पावसाची नोंद झाली.

काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 22 दलघफू पाणी नव्याने आले. घाटघर, पांजरे आणि रतनवाडीतील पाऊस मोजणी यंत्रणा नादुरूस्त असल्याने पावसाची आकडेवारी मिळत नाही. वाकी तलावातही पाणी साठा वाढत आहे. 112 दलघफू क्षमतेच्या या तलावात काल सायंकाळी 51.68 दलघफू पाणीसाठा होता. काल सोमवारी भंडारदरात केवळ 2 मिमी ची नोंद झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या