Sunday, June 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी : खा. ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार

मोठी बातमी : खा. ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार

धाराशिव मधून खा. ओमराजे निंबाळकर यांची घोषणा

- Advertisement -

धाराशिव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यात खा.ओमराजे यांचाही समावेश होता. तदनंतर काल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला. त्याच कालच्या न्यालयाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघात जाऊन चर्चा करून पक्ष बदलीचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान आज संध्याकाळी खा.ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव मध्ये त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचेशी चर्चा करून त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. अखेर लोकांची कामे करण्यासाठी निधी लागेल त्यासाठी सरकार सोबत म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

आज संध्याकाळी प्रसार माध्यमांसमोर बोलतांना खा. ओमराजे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकले नाही. आम्ही कामात कधीच कमी पडलो नसून लोकांच्या समस्या सोडविण्यात कमी पडलो नसून तरी सुद्धा अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र या कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. दरम्यान पैसा आणि हव्यासापोटी मी हा निर्णय घेतलेला नसून माझ्या मतदार संघातील विकास करण्यासाठी सत्तेत जाणे महत्वाचे असून सत्तेत जाऊन धाराशिवच्या जनतेला विकास करून दाखवून देईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

दरम्यान ओमराजे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार असून शेवटी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे विषयी कायम आदर राहणार असल्याचे व त्यांच्या विषयी कुठलीही वाईट वक्तव्य करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

उद्या पासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन; लोकप्रतिनिधींनी जनहिताचे प्रश्न मांडावेत आणि...

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (२२ जून) प्रारंभ होत असून हे अधिवेशन १० जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...