Wednesday, February 4, 2026
Homeनगरसासर्‍याचं वाटोळं करुन इतरांचं कल्याण करणारी सूनबाई कुणालाच नको

सासर्‍याचं वाटोळं करुन इतरांचं कल्याण करणारी सूनबाई कुणालाच नको

माजी आमदार मुरकुटेंनी घेतला वंदना मुरकुटेंचा समाचार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सासर्‍याचं वाटोळ करून इतरांच कल्याण करणारी सुनबाई कुणालाच नको, या जन्मी भेटलात पुढच्या जन्मी नको, अशा शब्दांत माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी सूनबाई डॉ. वंदनाताई मुरकुटे यांचा समाचार घेतला. काल अशोक कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सासरा व सूनबाई यांची चांगलीच जुगलबंदी पहावयास मिळाली.

- Advertisement -

काल अशोक कारखाना कार्यस्थळावर कारखान्याची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडली. सभेदरम्यान पंचायत समितीच्या माजी सभापती वंदनाताई मुरकुटे यांनी कारखाना प्रशासनाबाबत काही आक्षेप नोंदविले. त्याला उत्तर देताना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अशी डॉक्टर सूनबाई कुणाच्याच घरात नको, की जी सासर्‍याचं वाटोळ करून इतरांचा कल्याण करू पाहत आहेत. आजपर्यंत त्यांच्यासाठी सर्व काही केलं, जे नाही ते दिलं, अन् ते आम्हाला सांगतात चुकीचं काय आणि बरोबर काय. त्यांना हे सर्व वैभव उभ करून दिलं. मी काहीच केलं नसतं तर इतरांसारखी कामे करावी लागली असती.

YouTube video player

या आमच्या सूनबाई माझ्याविषयी अशा वागतात, तर लोकांविषयी त्यांना काय आपुलकी राहणार, केवळ सत्तेसाठी त्या हापापलेल्या आहेत, अशा शब्दांत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी त्यांची कान उघाडणी केली. सभा समाप्तीनंतर याविषयी सभासदांमध्ये चांगली चर्चा रंगलेली दिसली.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...