Thursday, June 4, 2026
HomeनाशिकDindori Loksabha 2024 : पहिल्या फेरीत भारती पवार पिछाडीवर; भगरेंना 'इतक्या' मतांची...

Dindori Loksabha 2024 : पहिल्या फेरीत भारती पवार पिछाडीवर; भगरेंना ‘इतक्या’ मतांची आघाडी

नाशिक | Nashik

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha) (दि.२० मे) रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी निकाल जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील एका गोडाऊनमध्ये या दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

नाशिक लोकसभेत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर दिंडोरीत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आणि भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यात लढत होत आहेत.

अशातच आता दिंडोरी लोकसभेची पहिल्या फेरीची मतमोजणी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी १ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. दिंडोरीत पहिल्या फेरीचे एकूण मतदान ५३८०७ मतांपैकी डॉ. भारती पवार यांना २२ हजार १८३ तर भास्कर भगरे यांना २३ हजार ४४३ इतकी मते मिळाली आहेत. तर नोटाला ३९८ मतदान झाले आहे. तर दुसऱ्या फेरीत भगरे ६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; चौघांची चौकशी

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल होत कारवाई केली, शहराच्या विविध भागांतील सात ते आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या...