Tuesday, March 25, 2025
HomeनगरAccident News : दुर्देवी! भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला भावा-बहिणीची कायमची ताटातूट, अपघातात भावाचा मृत्यू

Accident News : दुर्देवी! भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला भावा-बहिणीची कायमची ताटातूट, अपघातात भावाचा मृत्यू

राहुरी । प्रतिनिधी

भाऊबीजेसाठी बहिणीकडे साडी घेऊन निघालेल्या भावावर काळाने घातला आहे. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

एकेरी वाहतुकीमुळे या तरुणाचा ऐन सणासुदीला दुदैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना काल (शुक्रवार) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील कान्होबाची वाडी येथील २७ वर्षीय तरुण दत्ता पांडुरंग मोरे हा १ नोव्हेंबरच्या रात्री एम.एच.१७- सी- यु-३७६४ या क्रमांकाच्या दुचाकीवरून संगमनेर येथे भावबीजेसाठी बहिणीला साडी घेऊन जात असताना नगर-मनमाड मार्गावर चिंचोली फाटा येथील एकेरी वाहतूक सुरू असलेल्या ठिकाणी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी माजी सरपंच गणेश हारदे, अशोक टकले, योगेश वाघ, योगीराज कुलकर्णी आदिंसह नागरिकांनी मदतकार्य केले.रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठविण्यात आला. घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल सोमनाथ जायभाये यांनी पंचनामा केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...