किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे
25 मार्च – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्युन, चंद्र, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. तुमची महत्वाकांक्षा दांडगी राहील. तुमचे आदर्श उच्च प्रकारचे असतील. स्वतंत्र बाण्याप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे वेगळ्या पद्धतीने राहण्याची तुम्हाला फार हौस वाटेल. तुम्हाला धार्मिक भावना उदार असल्या तरी त्याविषयी तुमची मते भिन्न आणि वेगळ्या प्रकारची असतील. तुमच्याभोवती घडणार्या घटना व नैसर्गिक बदल यामागील गूढ व्यक्तीचा वेध घेण्याचा तुम्हाला फार आवड वाटेल. त्यामुळे काहींना स्वप्नातून पुढील घटनांची सूचना प्राप्त होणे शक्य आहे
26 मार्च – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी, गुरू, मंगल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. शनीच्या प्रभावाने व्यक्तीमत्वाला उदासीनतेची झालर असण्याची शक्यता आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. त्यासाठी शनी भरपूर कष्ट करून घेईल. कंटाळा न वाटता हौस आणि आनंदच वाटेल. मिळालेल्या यशामुळे अनेक गुप्तशत्रु निर्माण होतील. मत्सराची बाधा झाल्याने बदनामी करणे, गुप्त कारस्थाने करणे, असा त्रास देतील.
27 मार्च – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. मंगळाच्या प्रभावामुळे कोणताही निर्णय त्वरीत घेऊन त्याप्रमाणे तडकाफडकी कृती कराल. सदैव बेचैन असल्यामुळे चिडचिड करण्याची सवय असण्याची शक्यता आहे. सावध रहा. प्रत्यक्ष पैसा मिळवणे स्वतःसाठी महत्वाचे वाटले नाही तरी भरपूर प्रमाणात अर्थप्राप्ती होत राहील यात शंका नाही.
28 मार्च – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, रवि, गुरु, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. रवि आणि मेष यांच्या एकत्रितपणामुळे स्वभाव अत्यंत संवेदनशील राहील. अंतःस्फूर्तीची देणगी प्राप्त आहे. करिअर किंवा राहण्याच्या स्थळाविषयी बदल करण्यापूर्वी इतरांचा सल्ला घेण्यापेक्षा स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्यास जास्त फायद्याचा राहील. सुरूवातीला निर्णय तोट्याचा वाटला तरी शेवटी त्यात जास्त फायदा असल्याचे दिसून येईल. उतावळ्या स्वभावामुळे कोणत्याही कामात विलंब झालेला आवडणार नाही.
29 मार्च – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. कलाक्षेत्राकडे जास्त ओढ राहील. इच्छाशक्ती व निर्णयशक्तीत वाढ करून त्याप्रमाणे न डगमगता कृती केल्यास जीवनात प्रचंड यश मिळू शकेल. मात्र हे फक्त कलाक्षेत्रात लागू आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी. नैसर्गिक सौंदर्य, रंगसंगती, सूरसौंदर्य यांची चांगली जाण राहील. त्यामुळे आवडत्या कलाक्षेत्रात प्रगती करणे सोपे जाईल. भौतिक सुखाचे आकर्षण नसल्याने सुरूवातीचे आयुष्य खडतर जाण्याची शक्यता आहे.
30 मार्च – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरु, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. जीवनात यश मिळणार यात शंका नाही. इतरांवर हुकूमत गाजवणे ही शक्य होईल. भागीदारीत यश मिळेल. त्यासाठी उद्योगातील प्रमुखपद तुमच्या हातात असणे आवश्यक आहे. आदर्शवाद आणि वास्तविकता यांचा समतोल राखणे सहज जमेल. मोठ्मोठ्या धार्मिक, आर्थिक संस्थांशी तुमचा संबंध येईल. संकटकाळी मोठ्या रकमा दिल्याने दानशूर म्हणून तुमचा लौकीक होईल.
31 मार्च – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. जीवनाच्या पूर्वार्धात पुष्कळ अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण नातेवाईक, कुटूंबातील माणसे किंवा सासरवाडीकडील लोक यांच्याकडून त्रास संभवतो. विचार परंपरेला न जुळणारे असतील. स्वतंत्र बाण्यामुळे कार्यावर टिका होण्याची शक्यता आहे. शहाणपणा व दुसर्यावर विश्वास न ठेवण्याची वृत्ती आर्थिक परिस्थितीचे संरक्षण करतील. वारसाहक्काने संपत्ती मिळण्याचे योग.