प्रफुुुल्ल कुलकर्णी-ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड
8888747274
सध्या देशभर मीडियावर गाजत असलेल्या कंगना रनोत यांचा जन्म हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील सुरजपूर या छोट्याश्या गावात 23 मार्च 1987 रोजी झाला. त्या आज अवघ्या 33 वर्षांच्या आहेत. रनोत यांच्या आई शिक्षिका व व वडील व्यावसायिक आहेत.
कंगना यांचे बालपण एकत्र कुटुंबात गेले, त्यांचे पणजोबा विधान सभेचे सदस्य होते व आजोबा भारतीय प्रशासकीय सेवेत होते. कंगनाची शिक्षण दि ए. व्ही. हायस्कूल येथे झाल.े त्यांची अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून गणना होत असे. लहानपणापासूनच कंगना यांना भाऊ-बहीण यांच्यातील भेद भाव आवडत नव्हता.
मुलगी असली तरी त्या मुलगा असल्याप्रमाणे बिनधास्त वागत असत व चित्र विचित्र पोषाख परिधान करत असल्याने त्या कायम चर्चेत असत. सोळाव्या वर्षी कंगना दिल्लीत आल्या, त्यांना डॉक्टर व्हायचे होते परंतु त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली नाही व वेगळे क्षेत्र निवडण्याच्या नादात लागली, तिच्या घरच्यांनी तिला समजावून सांगणे सोडून दिले.
कंगना यांनी एलियट मॉडेलिंग अकॅडेमी प्रवेश घेऊन मॉडेलिंग केले पण तिचे यातही मन रमले नाही, त्यांनी अस्मिता थिएटर ग्रुप जॉईन केला, तिने नाटकात अभिनय केला, गिरीश कर्नाड यांच्या नाटकातही काम केले. या नाटकात एक पुरुष पात्र ऐन वेळेस आले नाही त्या वेळेस कंगना यांनी स्त्री पात्र बरोबरच पुरुष पात्राचाही नाटकात अभिनय केला व त्यासाठी खूप वाहवा मिळाली.
नशीब आजमावण्यासाठी कंगना यांनी दिल्ली सोडली व मुंबईला येऊन आशा चंद्रा यांच्या अभिनयाच्या अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. मुंबईला आल्यावर कंगनाची हालत खस्ता होती तिने ब्रेड व लोणचे खाऊन दिवस काढले वडिलांनी देऊ केलेली मदत तिने स्वीकारली नाही. त्याच दरम्यान तिच्या नातलगांनी कंगनाशी संबंध तोडले. महेश भट्ट यांचेकडे एजन्टने पाठविले असता तिथे अनुराग बसू यांनी कंगनाचे ऑडिशन घेतल्यावर गँगस्टर या चित्रपटासाठी तिला भूमिका देऊ केली, या वेळी कंगना यांचे वय फक्त सतरा होते.
सिमरन चित्रपटात दारूडया अभिनेत्री चा रोल मिळाला तो खूप हुबेहूब वटवल्यामुळे त्याचे फिल्म इंडस्ट्रीत कौतुक झाले. पुढे कंगना यांना अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. स्टारडस्टचा ब्रेक थ्रू परफॉर्मन्स अवॉर्ड मिळाला. कंगना यांनी तामिळ चित्रपटातसुद्धा काम केले. मधुर भंडारकर यांच्या फॅशन या चित्रपटातील काम बद्दल त्यांनी अांतरराष्ट्रीय ख्याती वाढली.
फिल्म फेयर अवॉर्डबरोबरच कंगना यांनी अनेक अवॉर्ड पटकावले. तनू वेड्स मनू, हृतिक रोशन यांच्या बरोबर काईट चित्रपट यासाठी बेस्ट ऐक्ट्रेस अवॉर्ड साठी नॉमिनेशन मिळाले. 2014 साली क्वीन या चित्रपट साठी त्यांना फिल्मफेयर व राष्ट्रीय बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळाला.2017 पर्यंत कंगना विविध वादात असल्याने तिचे चित्रपटातील काम कमी झाले.
2019 साली कंगना यांनी झाशीची राणी यांच्या जीवनावर मणिकर्णिका या नावाचा चित्रपट करण्याचे ठरविले, त्यात मुख्य भूमिकेसह चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ही काम पाहत होत्या. मुख्य दिग्दर्शक व चित्रपटातील हिरो सोनू सूद यांचा वाद झाल्याने कंगना यांची साथ सोडल्यानंतर, री-शूट केले व स्वतः दिग्दर्शनकरून चित्रपट प्रदर्शित केला, या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर उत्तम व्यवसाय केला. कंगना यांना विविध चरित्रात्मक व आव्हानात्मक अभिनय करायला आवडते, अभिनयातील कुठलेही अवघड आव्हान त्या स्विकारतात. भारत सरकारने या वर्षी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
कंगना रनोत यांच्या उजव्या हाताचे हस्तसामुद्रिकदृष्ट्या विवेचन
हातावरील आयुष्य रेषा उत्तम प्रकारातील असल्याने प्रतिकार शक्ति, निरोगीपणा, उत्साह, काम करण्याची क्षमता असल्याने शारीरिक व मानसिकदृष्ट्या अश्या व्यक्ती कणखर असतात.
आयुष्य रेषेतून उगम पावून शनी उंचवट्याकडे जाणारी उत्कर्ष रेषा वयाच्या 33 वर्षी म्हणजेच सध्याच्या काळात प्रसिद्धी व श्रीमंतीसाठी सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवणारी आहे.
हातावर मस्तक रेषा स्वतंत्र आहे,आपल्याला पटेल तेच करायचे ही वृत्ती असते, तसेच अत्यंत हुशारी अंगी असते, कुठलीही गाष्ट समजावून घेताना आत्मसात करताना यांना अडचण येत नाही. मस्तक रेषा बर्यापैकी सरळ वरच्या मंगळ उंचवट्याकडे गेल्याने व्यवहारात फसत नाहीत. भावनात्मक दृष्टीने होणार्या व्यवहाराला यांच्याकडे किंमत असत नाही.
दुसरी आयुष्य रेषेतून उगम पावणारी उत्कर्ष रेषा व तिच्याच मार्गात असलेली शनी उंचवट्याकडे जाणारी भाग्य रेषा ही अत्यंत शुभ असून प्रत्येक प्रयत्नाला यश देणारी भाग्य रेषा होय. ह्या रेषेचा उगम वयाच्या 50 वर्षाच्या दरम्यान होत असून या वयात कंगना अतिउच्च पदाला असणार आहेत. व तो राजकीय असो अथवा व अभिनेत्री व निर्माती म्हणून असो दोनही क्षेत्रात उत्तुंग यश मिळणार आहे,
हातावरील रवी रेषा हीसुद्धा अतिशय शुभ आहे, वयाच्या 17 व्या वर्षांपासूनच ती सरळ रवी ग्रहाकडे जाते, त्यामुळे वयाच्या 17 व्या वर्षा पासूनच प्रसिद्धी, मान सन्मान मिळायला लागला आहे. रवी रेषा पुढे बुध ग्रहाच्या पेर्यातून खाली रवी ग्रहावर आली हे स्वतंत्र रेषा अंतर राष्ट्रीयमान सन्मान देते. तसेच हातावरची मुख्य भाग्य रेषा शनी उंचवट्याकडे न जाता रवी उंचवट्याकडे वळली आहे अशी स्थिती असतांना मान सन्मान मिळतो व त्याच्यामुळे आर्थिक उन्नतीचे मार्गही मोकळे होतात.
हातावरची बुध रेषा चंद्र उंचवट्यावरून उगम पाऊन बुध ग्रहावर गेली आहे, ही रेषा आत्यंतिक हुशारी, चलाखी व व्यवस्थापनात कुशलपणा दाखविते.
हातावरील हृदय रेषा ही सरळ गुरु ग्रहावर गेली आहे, अश्या परिस्थितीत तीव्र स्वार्थी भावना असतात, टोकाचा राग व टोकाचे प्रेम असा यांचा स्वभाव असतो, दुसर्याचे ऐकत नाहीत भावनिक गोष्टींना बळी पडत नाहीत. कमानदार असलेली व गोल घेरा घेऊन गुरु बोटाच्या पेर्याकडे गेलेली हृदय रेषा ही सात्विक भावना देते मात्र सरळ असलेली हृदय रेषा भावनिक तडजोड फक्त स्वार्थासाठी करत असते .
कंगना यांच्या हातावरील गुरु, चंद्र व शुक्र ग्रह प्रभावशाली आहेत, गुरु ग्रह आत्मिक ताकद प्रदान करतो, सत्य वचन, कायदे पाळणे, नेतृत्व करणे आवडते, स्पष्ट बोलणे असते त्यामुळे त्यांच्या परिणामांची जाणीव त्यांना नसते. परंतु येथे गुरु ग्रहाने जास्त जागा व्यापल्याने अशा मंडळीमध्ये अहं भाव जास्त येत असतो, माझे तेच खरे म्हणण्याची प्रवृत्ती असते.
चंद्र ग्रह हाताच्या बाहेरच्या बाजूने फुगीर होऊन तो तळव्यापर्यंत व मनगटापर्यंत अत्यंत प्रभावशाली आहे त्यामुळे उपजत कला गुण व कल्पना विस्तार करण्याची क्षमता लाभली आहे. शुक्र ग्रह हातावर उच्चीचा असल्याने फॅशन व प्रभावी व्यक्तीमत्व कसे साकारत येईल याची देणगी शुक्र ग्रहाने प्रदान केली आहे. आपले व्यक्तिमत्व प्रभावशाली होण्या साठी यांचे प्रयत्न यशस्वी होतात व त्यांचे त्यांच्या फॅशनचे नेहमी कौतुक होते, त्यांना विविध पेहेराव करायला आवडतात.
कंगना यांचा सामान्यापेक्षा हाताचा मोठा आकार व त्यामुळे त्यांना लाभलेली निर्णय क्षमता !
कंगना यांच्या हाताचा आकार त्यांच्या एकंदरीत शरीरयष्टीपेक्षा खूपच मोठा आहे, बोटे लांब सडक व मुळा पाशी रुंद व जाड आहेत व पुढे ते नखाच्या टोकाकडे जाताना निमुळते होत गेलेले आहेत, निमुळत्या बोटामुळे कला क्षेत्रात यशस्वी झाल्या आहेत.
पहिले गुरुचे बोट बाकीच्या बोटांपेक्षा रुंद व मजबूत आहे, त्यामुळे गुरु ग्रहाचे कारकत्व लाभले आहे, त्यामुळे प्रभावशाली व्यक्तिमत्व व द़ृढनिश्चय, स्वतः वरचा विश्वास,अन्याया -विरुद्ध आवाज उठवणारे, सत्याची चाड असलेले गन प्राप्त होत असतात.
सहसा स्त्रीच्या हाताचा आकार हा तिच्या देहयष्टी पेक्षाही लहान असलेला पाहावयास मिळतो, ज्या स्त्रीचा हात मोठा व मजबूत आहे त्यांचे घरात राज्य चालते, त्या कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत वावरत असतात, त्यांना घरात ही मान असतो. त्यांच्यात निर्णय क्षमता पुरुषांसारखी असते.
अंगठ्याचा आकार मोठा व मजबूत आहे, अशा व्यक्ती कोणाच्याही अधिपत्याखाली राहू शकत नाहीत, गुलामगिरी माहित नसते, आपले तेच खरे असा यांचा बाणा असतो, स्वतःच्या विचारात किंवा त्यांनी केलेल्या नियमात ज्या गोष्टी बसत नाहीत त्या त्यांना मान्य नसतात व त्याचा ते स्वीकार करीत नाहीत. अंगठ्याची दोनही पेरे उत्तम असून पहिले पेर कल्पनाविलास देते व दुसरे पेर हे त्यांच्या मनातल्या कल्पनेप्रमाणे त्वरित कृती करायला लावते त्यांची अंमलबजावणी विना विलंब करते.