मेष – सहकारी उपयोगी पडतील
आर्थिक बाबतीत कोणत्याही प्रकारची उलाढाल करताना काळजीपूर्वक करा. दोषारोपाने उद्विग्न मनस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जवळचे सहकारी उपयोगी पडतील. भागीदारीसाठी विचारणा होण्याची शक्यता आहे. भविष्यात घडणार्या घटनांचा अंदाज येईल. पारिवारिक स्नेह वाढेल. नयनरम्य स्थळांच्या सहलीला जाण्याचे योग आहेत. शस्त्रक्रिया संभवते. व्यावहारिक जगापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कामामध्ये प्रगती होईल. व्यापार उद्योगात फायदा होईल. शुभ तारखा : 27,28
वृषभ – प्रगतीचा आलेख वाढेल
ठरवलेल्या कार्याचा उद्देश सफल होईल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचा आलेख वाढेल. आर्थिक व्यवहाराबाबत भावनिक निर्णय घेऊ नका. खर्चाचा ताळेबंद आखने गरजेचे आहे. संततीकडून सहयोग मिळेल. कलाकारांसाठी उत्तम संधी उपलब्ध होतील. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकाल. मित्रपरिवाराच्या सहाय्याने अनेक कामांना गती मिळेल. मनातील विचारांना योग्य दिशा मिळाल्याचा मनोमन आनंद उपभोगाल.शुभ तारखा : 28, 30
मिथुन – सामाजिक मान प्रतिष्ठा वाढेल
स्थावर इस्टेटीचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी अनुकूल काळ आहे. नवीन वाहन खरेदी करू शकाल. नवीन व्यवसाय-उद्योग सुरु करण्याच्या प्रयत्नात असाल तर त्यात यश संपादन कराल. लाभाचे पद प्राप्त होईल. सामाजिक मान प्रतिष्ठा वाढेल. प्राकृतिक मानाने काहीशी अस्वस्थता वाटेल. अतिविश्वासाने घात होण्याची शक्यता आहे. द्विधा मनस्थितीत काळाचा अपव्यय होण्याची शक्यता. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. कौटुंबिक जीवनात आनंदी व्हाल. आर्थिक व्यवहारात अनियमितता येऊन व्यवहारात नुकसानीची शक्यता. शुभ तारखा ः 30,31
कर्क – यशाची चाहूल लागेल
कर्तव्य पार पाडावी लागतील. मंगल कार्यात सहभागी व्हाल. न्यायहक्कासाठी लढत असलेली लढाई अंतिम पायरीवर येईल व यशाची चाहूल लागेल. कामकाजात प्रगती होईल. अधिकारात वाढ होईल. मनाला आनंद देणार्या घटना ऐकायला मिळतील. संतती विषयक प्रश्नावर उपाय लागू पडतील. जवळचे प्रवास घडून येतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. शुभ तारखा : 30
सिंह – अर्थार्जन उत्तमप्रकारे करू शकाल
दगदग -धावपळीचा आठवडा आहे. कामकाजाचे नियोजन करणे इष्ट ठरेल. अर्थार्जन उत्तमप्रकारे करू शकाल. दिशाहीन विषयावर वाटचाल होणार नाही याची काळजी घ्या. दूरच्या नातेवाईकांकडून सहकार्य प्राप्त होईल. सामाजिक मानसन्मान मिळेल. स्पर्धा परीक्षेत सहभाग घेण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. राजकीय क्षेत्रात होणार्या मानहानीमुळे विचलित मनस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काळजीपूर्वक नियोजन करावे. प्राकृतिक कारणाने अस्वस्थता जाणवेल. हितशत्रूंचा त्रास मनाला बेचैन करील. शुभ तारखा ः 26, 29
कन्या – परदेश गमन योग संभवतो
दीर्घ काळासाठी फायदा होईल असे निर्णय घ्याल . वैचारिक पातळीवर मनस्वी आनंदी रहाल. कौटुंबिक जीवनात चढ उतार अनुभवायला मिळतील. मित्रांकडून जास्त अपेक्षा करणे घातक ठरेल. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. कौटुंबिक जीवनात आनंदी व्हाल. आर्थिक व्यवहारात अनियमितता येऊन व्यवहारात नुकसानीची शक्यता. शुभ तारखा : 29, 30
तूळ – शत्रूचे नामोहरण करण्यात यश
प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, छोटेमोठे आजार डोके वर काढतील. शत्रूचे नामोहरन करण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक भागीदाराशी यशस्वी बोलणी होऊन मागील प्रलंबित समस्या सुटण्यास मदत होईल. विवाहासाठी उत्तम कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अनपेक्षीत घटना घडतील. प्रवासाच्या दरम्यान काळजी घ्यावी . संगती संग दोष: या वचनाची प्रत्यक्ष अनुभूती येईल. शुभ तारखा : 30, 31
वृश्चिक – शुभ वार्ता ऐकायला मिळतील
जिवलग व्यक्तींचा सहवास लाभेल. सुखद घटनांचा सिलसिला चालू राहिल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसायाच्या ठिकाणी शुभ वार्ता ऐकायला मिळतील. मामा मावशी किंवा आजोळच्या लोकांच्या भेटीचे योग संभवतात. कामानिमित्त न्यायालयाची पायरी चढावी लागेल. वैवाहिक जोडीदारासोबत वेळ व्यतीत होईल. हित शत्रूंच्या कारवाईमुळे मानसिक कमजोरी जाणवेल. व्यावसायिक कामात कार्यमग्न रहाल.शुभ तारखा : 31
धनू – वाहन खरेदीचे योग
आई वडील यांच्या समवेत वेळ व्यतीत होईल. वाहन खरेदीचे योग संभवतात. स्वप्नपूर्तीचा काळ आहे. घर खरेदी विषयक बोलणी मार्गी लागतील. प्रेमात यश मिळेल. मित्रांचा सहवास लाभेल. सामाजिक कार्यात कार्यमग्नता वाढेल. परीक्षार्थींना यश मिळेल. प्रवासदरम्यान किरकोळ आजार वाढू शकतात. सप्ताहाच्या शेवटी पाठीचे दुखणे जाणवेल. शुभ तारखा : 29, 30
मकर – शैक्षणिक क्षेत्रात प्रगती
आप्तेष्ठांच्या भेटीगाठी होतील. राजदरबारात सन्मानाची वागणूक मिळेल. भावकीतील वादावर मध्यस्थी होऊन सकारात्मक दिशेने वाटचाल कराल. लोकहिताचे निर्णय घेतल्याने जनमानसात प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थी मंडळींचा आत्मविश्वास वृद्धिगंत होईल. शुभ तारखा : 30, 31
कुंभ – कुटुंबासाठी वेळ द्यावा
पारिवारिक संबंधावर परिस्थिती सुधारण्यासाठी लक्ष केंद्रित कराल. राजकीय- सामाजिक उन्नतीसाठी केलेला प्रयासास सकारात्मक प्रतिसाद मिळेल. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. गृहसजावटीच्या वस्तू खरेदी कराल. विविध क्षेत्रातील व्यावसायिक मातब्बर लोकांच्या अनुभवाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होईल. आपण करीत असलेल्या कामाला योग्य प्रतिसाद मिळेल. शुभ तारखा : 27, 28
मीन – गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ
प्रत्यक्ष कामाच्या दिशेने उचललेले प्रत्येक पाऊल याबाबत नियोजन आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहे. प्रकृतीविषयक काळजी घेणे आवश्यक आहे. शब्दाला सन्मान मिळेल. भागीदाराकडून योग्य सहकार्य मिळेल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील.शुभ तारखा : 30