Friday, May 3, 2024
Homeनगरभिंगारचे सात गुन्हेगार होणार हद्दपार

भिंगारचे सात गुन्हेगार होणार हद्दपार

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmedagar

भिंगार (Bhingar) व परिसरात गुन्हे करणाऱ्या सात सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये प्रांतअधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या या आरोपींना लवकरच हद्दपार केले जाईल, अशी माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.

- Advertisement -

भिंगार व परिसरात मध्यंतरी मोठ्याप्रमाणात गुन्हेगारीने डोके वर काढले होते. एका टोळीविरोधात मोक्का लावण्यात आला आहे. संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या १२ टोळ्या भिंगारमध्ये सक्रीय असून त्यांनी आता गुन्हे करणे सोडून दिले आहेत. परंतु, वारंवार गुन्हे करणाऱ्या सात सराईत गुन्हेगारांना वचक बसावा यासाठी त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे, असा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याचे निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.

ते म्हणाले, आर्थिक फायद्यासाठी एखाद्या टोळीने संघटीत गुन्हे केल्यास त्यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली जाते. आमच्या हद्दीत एका टोळीवर मोक्का लावण्यात आला असून त्याचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. यामुळे संघटीत टोळ्यांवर वचक निर्माण झाला आहे. काही गुन्हेगार हे सराईत असून अशांना हद्दपार केल्यास त्यांच्यावर वचक निर्माण होईल, यासाठी त्यांना हद्दपार करण्याचा प्रयत्न आमचा असून यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील आठ टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच वर्षभरात जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या १५ टोळ्या व सुमारे ४१ आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे. यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या