Thursday, May 9, 2024
Homeजळगावअघोरी शक्ती असल्याचे सांगत भोंदूबाबाने 11 लाखांत गंडविले

अघोरी शक्ती असल्याचे सांगत भोंदूबाबाने 11 लाखांत गंडविले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तुमच्या घरात भूतबाधा (demon possession) झाली असून आत्मा (soul) देखील आहे त्यामुळे घरात वाद (Argument at home) होत असल्याची बतावणी (pretending) करुन व भूतबाधा दूर करण्याचे सांगत दाम्पत्याला (couple) भोंदूबाबासह (Bhondubaba) त्याच्या पत्नीने (wife) तब्बल साडेअकरा लाखांत (eleven and a half lakhs) गंडविल्याचा (messed up) प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात (Ramanand Nagar Police Station) भोंदुबाबासह त्याची पत्नी विरोधात महाराष्ट्र नरबळी, जादुटोणा व इतर अमानुष, अघोरी प्रथा विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील एक दाम्पत्य कोरोना काळात तणावात होते. तसेच त्या दाम्पत्यामध्ये भांडण झाल्यामुळे ती विवाहिता आपल्या माहेरी निघून गेली होती. यावेळी त्या विवाहितेची मैत्रीणीशी तिचा संपर्क झाला असता. तीने घडलेल्या घटनेबाबाबत तिच्या कॉलेजची मैत्रीण मोहिनी हिने माझ्या घरी ये माझे पती यावर काहीतरी उपाय करतील असे सांगितले.

त्यानुसार ती महिला सावखेडा शिवार येथील मेरा घर अपार्टमेंटमध्ये गेल्यावर भोंदुबाबा ललित पाटील यांनी सांगितले की, नुकताच मृत झालेल्या तुझ्या दिराचा आत्मा तूझ्या अंगात घुसला आहे. त्या आत्म्याचे घरावर प्रेम असल्याने त्याची शांती केल्याशिवाय घरातील ही बाधा दूर होणे अशक्य असल्याचे त्याने सांगितले.

शिवाय तुमच्या घरावर बाहेरची बाधा असल्याने नोकरीत अपयश, आर्थिक चणचण, घरात वाद, पती पत्नी मध्ये भांडण होते. अशा प्रकारे घरगुती ओळखीचा फायदा घेत महिमा पाटील हिने आपल्या पती ललित अघोरी पुजा करतो. त्याच्या अंगात पीर येतो असे सांगत विश्वास संपादन केला. त्याचप्रमाणे भारत- पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या कनोट माता मंदिर परिसरातील गुप्तधन हवन पूजा विधी करून मिळणार असल्याचे त्यांनी तिच्या मैत्रीणीला सांगितले.

तनौट, उज्जैन, अजमेर येथे केले होमहवन

भोंदूबाबा व त्याच्या पत्नीने त्या दाम्पत्याला तनौट, ओंकारेश्वर, उज्जैन, अजमेर येथे होम हवन, पूजा विधी करावा लागेल असे सांगतले. त्यानुसार त्या दाम्पत्याने भोंदूबाबाच्या दाव्याला बळी पडत त्यांना अनेकदा ऑनलाईन व रोख अशा स्वरुपात सुमारे साडेअकरा लाखांची रक्कम देत आपली स्वत:ची फसवणुक करुन घेतली.

कर्ज काढून उभी केली लाखोची रक्कम

भूलथापांना बळी पडलेल्या दाम्पत्याने दिलेली रक्कम ही त्यांनी आपले नातेवाईक, बचत गट अशा विविध माध्यमातून कर्ज काढून ही रक्कम भोंदूबाबाला दिली आहे. गेल्या काही दिवसांत कर्ज वाढले स्वास्थ्य हरवले काय करावे? असं वाटतं असताना प्रकरण पोलिसात गेले तेंव्हा या बाबाने मी अघोरी शक्ती ने तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन. पैसे परत मागू नका, अशी धमकी दिली.

अंनिसने उघडकीस आला प्रकार

फसणुक झाल्याचे कळल्यानंतर त्या दाम्पत्याने वेबसाईड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा ऑफिस मध्ये संपर्क केला. सर्व प्रकरण समजून घेतल्या नंतर महा अंनिसच्या बुवाबाजी संघर्ष समिती सदस्य नंदिनी जाधव, राज्य कार्यकारी समिती सदस्य मिलिंद देशमुख, अण्णा कडलासकर, महीला विभाग सदस्य निता सामंत यांच्या सोबतीने त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना गुन्हा दाखल करण्याबाबत विनंती अर्ज दिला.

भोंदूबाबा विरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ भोंदूबाबा ललित हिंमतीरप पाटील व त्याची पत्नी महिमा उर्फ मनोरमा लति पाटील दोघ रा. सावखेडा शिवार या दाम्पत्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अघोरी, अमानुष, अनिष्ट प्रथा आणि जादुटोणा प्रतिबंध करणार्‍या कायद्याच्या कलम 3(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या