Saturday, October 12, 2024
Homeनगरसाईबाबांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो - भुपेश बघेल

साईबाबांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो – भुपेश बघेल

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो असून साईंच्या दर्शनामुळे आत्मीक समाधान मिळते. देशात सर्वत्र भाजपची लाट असताना

- Advertisement -

छत्तीसगड सारख्या राज्यात काँग्रेसला 90 पैकी 70 आमदारांनी विजय प्राप्त करत काँग्रेसची सत्ता मिळणे यात देखील साईबाबांचा आशीर्वाद असल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री ना. भुपेश बघेल यांनी केले.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी काल बुधवार दिनांक 13 रोजी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री बघेल यांचा साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांच्याहस्ते शाल, उदी देऊन सत्कार केला. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, काँग्रेस कमिटीचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

ना. बघेल यांचे खाजगी हेलिकॉप्टरमधून दुपारी साडेबाराच्या सुमारास साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर आगमन झाले. याप्रसंगी काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष सचिन चौगुले यानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. साई दर्शनानंतर त्यांनी शिर्डी शहर तसेच जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांबरोबर पक्षवाढी संदर्भात चर्चा केली व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या