Thursday, May 2, 2024
Homeजळगावरावतेंच्या ‘शिवशाही’ला परबांचा ब्रेक !

रावतेंच्या ‘शिवशाही’ला परबांचा ब्रेक !

भुसावळ । आशिष पाटील – 

भाजपा-सेना सरकारच्या काळात मोठा गाजावाजा करीत तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सुरु केलेली शिवशाही बस सेवा गेल्या दोन दिवसांपासून बंद झाल्याची विश्वसनीय माहिती मिळत असून शिवसेनेच्या मंत्र्यांनीच सुरु केलेली ही योजना सेनेच्याच मंत्र्यांनी बंद केल्याची चर्चा असून विद्यमान परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही योजना गुंढाळल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

दिवाकर रावतेंच्या आग्रहाखातर राज्य परिवहन मंडळाने साडेतीन वर्षांपूर्वी खाजगी कंपनीच्या सहकार्याने शिवशाही राज्यभरात सुरु केल्या होत्या.त्याची सेवा जळगाव,धुळे,नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील सुरु होती.ही सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे चालवली जात असली तरी या मार्गावरील बस खाजगी कंत्राटदारांच्या असतात. महामंडळ कंत्राटदारास प्रति किलोमीटर 18 रुपये भाडे देते. याशिवाय इंधन, चालक आणि टोल यांसह इतर सगळे खर्च महामंडळाची जबाबदारी असते. अशी तरतूद यावेळी करारात करण्यात आली होती.

राज्यात सुरु झालेल्या या गाड्या व त्याबद्दलची महामंडळ प्रशासनची भुमिका यामुळे महामंडळाचा तोटा 500 कोटीवरुन 4 हजार 500 कोटी इतका वाढल्यामुळे महामंडळाने हा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. शिवशाही गाड्यांमधुन सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास शक्य नसल्यामुळे प्रवासी शिवशाही व साध्या बस पासून दुरवला व शिवशाही गाड्या ही रिकाम्याच धावल्या .

त्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कंपनीकडून कराराचे पालन न होने. अशातच राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता कंपनीकडून सुरु करण्यात आलेल्या या गाड्या बंद करण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.त्यामुळे रावतेंच्या शिवशाहीला परबांकडून ब्रेक दिल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या