Sunday, September 15, 2024
Homeजळगावनाताळची २१० वर्षांची परंपरा खंडित

नाताळची २१० वर्षांची परंपरा खंडित

भुसावळ – प्रतिनिधी – Bhusawal :

- Advertisement -

दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार्‍या नाताळ सणावर यावर्षी करोनाचे सावट असल्यामुळे शहराच्या इतिहासातील २१० वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे.

करोनाच्या संकटांमुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आली आहे. चर्चमध्ये फक्त प्रार्थना धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कोरोनाच्या नियमांचे पालन करुन करण्यात येत आहे.

शहरात साधारण सन १८१० पासून नाताळ सण साजरा होत आहे. मात्र आतापर्यंत सणाच्या परंपरा खंडीत करण्याची आपत्ती आली नव्हती.

मात्र शहराच्या इतिहासात आता साधारण २१० वर्षांनंतर नाताळची परंपरा कोरोनामुळे पहिल्यांदाच खंडित झाली आहे.

त्यामुळे चर्चामध्ये साध्या पद्धतीने कमी गर्दीत धार्मिक कार्यक्रम पार पाडले जात आहे. शहरात सन १८१० पासून किंवा त्यापूर्वीपासून ख्रिस्त बांधवांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला शहरातील रेल्वे दवाखान्याजवळ पहिली चर्च होती.

त्यानंतर १९च्या शतकात १९१५ मध्ये अलायंस मराठी चर्चा तर सेंट पॉल चर्च, हिंदी अलायन्स चर्च, सिक्रेट हार्ट चर्च (१९२७), एजीसी चर्च, इमान्युएल मराठी चर्चा यासह अनेक चर्चा ची स्थापना शहरात काळानुरुप करणयात आल्या.

चर्चा वा समाज बांधांची मोठी संख्या पाहता शहरात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याकाळात समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी ही होतेे.

मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे समाज बांधवांमध्ये उत्साह दिसून येत नाही. त्यात शासनाच्या नियमांचे पालन करुन उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहे.या काळात परिसरातील चर्चला आषर्कक रोशनाई करुन सजविण्यात आले आहे.

दरम्यान, ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त येथील मराठी अलायंस चर्चसमध्ये सकाळी ९ ते ११ वाजे दरम्यान जन्मोत्सव व धार्मिक कार्यक्रम चर्च मध्ये पार पडले.

त्यानंतर फादर स्पप्निल नाशिककर यांनी समाज बांधवांना संदेश दिला. त्यानंतर समाज बांधांनी एक -दुसर्‍यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या. चर्चामध्ये फक्त प्रार्थना घेण्यात आल्या. त्याच पद्धतीने सेंट पॉल चर्चामध्येही याच पद्धतीने जन्मोत्सव, प्रार्थना व संदेश देण्यात आले.

अल्पसंख्यांक कॉंग्रेसतर्फे सदिच्छा- पदाधिकार्‍यांनी येथील मराठी अलायंस चर्चमध्ये जाऊन ख्रिस्त बांधवांना सदिच्छा दिल्या. तत्पूर्वी पास्टर स्वप्निल नाशिककर यांचा सपत्नीक सत्कार केला.

यावेळी प्रवीण ओहोळ, सेक्रेटरी फिलीप फ्रांसिस, प्रमोद जाधव, पंच जया फ्रांसीस, यांनाही सदिच्छा दिल्या. प्रसंगी जिल्हाध्यक्ष मो. मुन्नवर खान, उपाध्यक्ष जे.बी. कोटेचा, डॉ. नईम मझहर , अकिल शाह, शहर सचिव हमीद सर, जगपालसिंग गिल, ईसाक चौधरी, शहराध्यक्ष सलीम गवळी, रमजान खाटीक, हमीदा गवळी, लतीका मणी, विनोद शर्मा, चंद्रसिंग चौधरी, यांच्यासह पदाधिकार्‍यांनी ख्रिस्ती बांधवांना सदिच्छा दिल्या

- Advertisment -

ताज्या बातम्या