नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जीएसटी काउंसिलची 56वी बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
आता फक्त 5 आणि 18 टक्के जीएसटी स्लॅब असणार आहे. त्यामुळे सर्व वस्तू या दोन स्लॅबच्या आतच बसणार आहे. म्हणजेच 28 टक्के जीएसटी असलेली वस्तू 18 टक्क्यांपर्यंत येणार आहे. जीएसटीतील 12 आणि 28 टक्के हे स्लॅब काढून टाकले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.
नवीन जीएसटी रचनेनंतर आलिशान गाड्या, साखरेचे पेय, फास्ट फूड महागणार आहेत. काही वस्तूंवरील कर हा १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तसेच लक्झरी वस्तूंसाठी ४० टक्के कर लागणार आहे. पान मसाला, गुटखा, दारू आदी वस्तूंवर ४० टक्के जीएसटी लागणार आहे.
वैयक्तिक विमा पॉलिसी आणि आरोग्य विमा पॉलिसी जीएसटीमुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे विमा खरेदी आता स्वस्त झाली आहे. ३३ जीवनरक्षक औषधे जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहेत. सिमेंटवरील जीएसटी देखील २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यापर्यंत कमी झाला आहे. छोट्या कार आणि मोटारसायकली (३५० सीसी), टीव्ही आदी गोष्टी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्यात आल्या आहेत.
पिझ्झा, ब्रेड, दूध आणि चीजवर जीएसटी लागणार नाही. २५०० रुपयांपर्यंतच्या शूज आणि कपड्यांवरील जीएसटी दर ५ टक्के करण्यात आला आहे. शाम्पू, साबण, तेल आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्या इतर घरगुती वस्तूंव्यतिरिक्त नमकीन, पास्ता, कॉफी, नुडल्सवर आता ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.
12% आणि 28% स्लॅब रद्द.
– 12% मधील 99% वस्तू आता 5% मध्ये.
– 28% मधील बहुतांश वस्तू 18% मध्ये.
– पान मसाला, तंबाखू यांसारख्या सिन गुड्स आणि लक्झरी गाड्यांवर 40% चा नवीन स्लॅब प्रस्तावित.




