Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं"; भाजपच्या वाटेवरील 'या' बड्या नेत्याचं गणरायाला...

“राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं”; भाजपच्या वाटेवरील ‘या’ बड्या नेत्याचं गणरायाला साकडं

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahayuti and Mahavikas Aaghadi) घटक पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी काय समीकरणं असतील, तिथे कोण फोडता येईल याची महाविकास आघाडीकडून चाचपणी केली जात आहे. तर काही ठिकाणी महायुतीचे नेते मविआत प्रवेश देखील करत आहेत. त्यामुळे महायुतीची अनेक मतदारसंघांत डोकेदुखी चांगलीच वाढत आहे. अशातच आता भाजपच्या (BJP) वाटेवर असलेले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं, असं साकडं गणरायाला घातलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : बोराळे फाट्याजवळ भीषण अपघात; तीन युवकांचा मृत्यू

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले की, सध्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणाची स्थिती चांगली राहिलेली नाही. मागील काही महिन्यांमधील महायुतीचा अनुभव चांगला वाटत नाही. महायुती सरकार आल्यापासून राज्यात फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सूडबुध्दीने ईडी सीबीआय (ED & CBI) सारख्या कारवाया करत आहेत. जनता महागाईने त्रस्त आहे, उट्टे काढण्याचे काम करत असल्याने जनतेची कामे होत नाहीत. त्यामुळे हे सरकार जावे आणि महाविकास आघाडीचे सरकार यावे असं मला वाटते. तसं साकडं मी गणरायाकडेही घातलं आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : नाशकात महागणेशाेत्सव; ७५० सार्वजनिक मंडळांकडून नाेंदणी

तसेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणली असल्याचे जनतेलाही कळते. ही योजना पाच वर्षापूर्वीच आणायला पाहिजे होती. योजनेला आपला विरोध नाही मात्र, इकडे केलेला खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे. एवढाच खर्च जर धरणे उभारणी, रस्ते निर्मितीसाठी केला असता तर त्यातून रोजगार निर्माण झाले असते. त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अलिशान साेसायटीत कुंटणखाना; पीसीबी-एमओबीचा छापा, महिलेसह दलाल अटकेत

खडसेंचा भाजप प्रवेश रखडला

एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये यायचे आहे.मात्र, त्यांचा प्रवेश अद्याप झालेला नाही. लोकसभेपूर्वीपासून ते भाजपमध्ये येण्याची तयारी करत आहे. याविषयीचा खुलासा त्यांनीच अनेकदा माध्यमांशी बोलतांना केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) ते दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. तेव्हा त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात होता. त्यानंतर नुकतेच काही दिवसांपूर्वी जळगावात (Jalgaon) लखपती दीदींचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव येथे आले होते. तेव्हाही त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगली होती.पण, या कार्यक्रमाला साधे निमंत्रणही पाठवण्यात आले नसल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यामुळे अजूनही खडसेंचा भाजप प्रवेश रखडला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या