Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशसर्वात मोठा बदल; मुस्लीम बहुल भागात भाजपची घोडदौड

सर्वात मोठा बदल; मुस्लीम बहुल भागात भाजपची घोडदौड

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये भाजपने चार राज्यांत निर्णायक आघाडी घेतलेली दिसते आहे. तर पंजाबमध्ये आपने जोरदार मुसंडी मारली आहे. मोदींचा विजयी रथ उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याच्या मार्गावर आहे….

- Advertisement -

403 जागांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत 202 जागा विजयासाठी आवश्यक आहेत. अद्याप मतमोजणी बाकी असली तरी भाजप 260 हून अधिक मतदारसंघांत आघाडीवर दिसून येत आहे.

उत्तर प्रदेशातील राजकारणात प्रथमपासूनच जाती-पाती आणि धर्म हे मुद्दे वरचढ ठरले आहेत. अयोध्येचे राम मंदिर हा अनेक वर्षं राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. भाजप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसनेही या मुद्द्यांना वेळोवेळी महत्त्व दिलेले होते.

उत्तर प्रदेशातल्या 403 पैकी 73 मतदारसंघांमध्ये मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. या भागातून भाजपला यापूर्वी फारशी संधी मिळालेली नव्हती. मात्र या वेळी 73 पैकी 46 मतदारसंघांमध्येही भाजपच आघाडीवर आहे. वर्षानुवर्षं मुस्लीम मते गृहित धरणाऱ्या काँग्रेसला या 73 पैकी एखाद्याच मतदारसंघाने हात दिला आहे. समाजवादी पार्टीलाही 73 पैकी फक्त 25 मतदारसंघात आघाडी मिळाली दिसते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या