Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याकोल्हापुरात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार?

कोल्हापुरात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार?

मुंबई l Mumbai

राज्याच्या राजकारणात वादळ उठवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसला एकावर एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या भागातील शिवसेनेतील नेते शिंदे गटात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातही आता शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हेदेखील पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याच्या तयारीत आहेत. आज याबाबत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पक्षाचे दुसरे खासदार धैर्यशील माने हेदेखील याच मार्गावर असल्याचे समजते.

दरम्यान संजय मंडलिक यांनी चार दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होते, आता जे राहिले ते अस्सल सोनं आहे, असं म्हणत आपण शिवसेना सोडणार नाही अशी घोषणाच केली. पण त्यानंतर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीला आणि कोल्हापुरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्याला त्यांनी दांडी मारली.

तर दुसरीकडे, धैर्यशील माने मातोश्रीला गेले मात्र कोल्हापूरच्या मेळाव्याकडे फिरकले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणणार अशी चर्चा जोरात सुरू झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या