Friday, November 15, 2024
HomeराजकीयBihar Election 2020 : निलेश राणेंची शिवसेनेवर बोचरी टीका, म्हणाले...

Bihar Election 2020 : निलेश राणेंची शिवसेनेवर बोचरी टीका, म्हणाले…

मुंबई | Mumbai

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना देखील सज्ज झाली आहे. बिहारच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार असल्याचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यानंतर आता शिवसेनेने आपल्या स्टार कॅम्पनेर्सची यादी देखील जाहीर केली आहे. या मुद्य्यावरून भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी शिवसेनेवर बोचरी टिका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे.

- Advertisement -

निलेश राणे यांनी म्हंटले आहे कि, “ह्या स्टार कॅम्पेनर्स ना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील वाचले नाही हा इतिहास आहे.”

“हे” आहेत शिवसेनेचे स्टार प्रचारक

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बिहारनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचाही समावेश आहे. याशिवाय शिवसेना नेते सुभाष देसाई, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे.याव्यतिरिक्त राजकुमार बाफना, कृपाल तुमाणे, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, कौशैलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबाचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा समावेश आहे. हे सर्व नेते बिहार निवडणूकीतील शिवसेनेच्या उमेदवारांचा स्टार प्रचारक म्हणून प्रचार करतील.

बिहार निवडणूक 3 टप्प्यात पार पडणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर या तीन दिवशी मतदान होणार असून 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यासाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी अशा 20 जणांचा समावेश आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या