Wednesday, December 4, 2024
Homeनगरभाजपला साखर कारखाने बंद पाडून आदानी-अंबानीच्या घशात घालायचे

भाजपला साखर कारखाने बंद पाडून आदानी-अंबानीच्या घशात घालायचे

ठाकरे यांचा गंभीर आरोप || खतांसह शेती वस्तूंवरील जीएसटी रद्द करा

नेवासे/ श्रीगोंदा |प्रतिनिधी|Newasa| Shrigonda

भाजप आणि मोदी, शहा यांना सहकारी साखर कारखाने बंद पाडून ते अदानी-अंबानीच्या घशात घालायचे आहेत. भाजपचे नेते जातात तिकडे खातात. त्यांनी अनेक उद्योग गुजरातला पळविल्याने महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली असल्याचा गंभीर आरोप उध्दव ठाकरे यांनी केला. जिल्ह्यातील नेवासे आणि श्रीगोंदा येथे उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसाठी सभा घेतली. नेवासे येथे महायुतीचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्यासाठी आयोजित सभेत केंद्रीय सहकार खाते निर्माण करून केवळ महाराष्ट्रातील सहकार गिळंकृत करण्यासाठी अमित शहांनी ते स्वतःच्या बुडाखाली दाबून धरल्याचा आरोप केला. लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला.

- Advertisement -

त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. पण आमची महायुती लाडक्या बहिणींना नुसते पैसे नाही, तर त्यांना सुरक्षा कवच सुध्दा देऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी यावेळी दिले. लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा यांनी महाराष्ट्रात येऊन वेगवेगळी आमिषे दाखवली. परंतु त्यांचा निभाव लागला नाही. श्रीगोंदा येथील सभेत ते म्हणाले, महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज शेतकरी अडचणीत आहे. शेतकर्‍यांना मदत करायची आहे, तर खते कीटकनाशके यासह शेतीसाठी आवश्यक वस्तूंवरील जीएसटी हटवा, तसेच जीवनावश्यक वास्तूचे दर कमी करा, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारला केली. मुलींच्या बरोबरीने मुलांना देखिल मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या