पाटणा | Patna
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सुरुवातीला जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएची वाटचाल आता २०० जागांच्या दिशेने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महागठबंधन अवघ्या ३९ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. सध्याच्या कलांनुसार, बिहारमध्ये भाजप ९१, जेडीयू ७८ जागांवर आघाडीवर आहे. तर आरजेडी २८ आणि काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे २४३ जागांपैकी १९६ जागांवर एनडीए आणि महागठबंधन आघाडीचे उमेदवार अवघ्या ३७ जागांवर आघाडीवर आहेत.
यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीत नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अजितदादांच्या एकाही उमेदवाराला दखलपात्रही कामगिरी करता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही वाचणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागणार आहे.
बिहारमध्ये आज सकाळपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. काही वेळातच निवडणुकीचे अंतिम निकाल हाती येण्यास सुरवात होईल. यामध्ये महाराष्ट्रातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला जिंकणे तर दूर सोडा पण आघाडीही घेता आलेली नाही. १५ पैकी १३ जागांवर अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. अजित पवारांच्या या उमेदवारांना अद्याप ५०० मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. हे चित्र कायम राहिल्यास बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. हे असे चित्र कायम राहिल्यास बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, १ वाजेपर्यंत जे कल हाती आले, त्यानुसार, एनडीएत घटक पक्ष असलेल्या भाजपाचे ९१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पक्षाचे ८१ उमेदवार आघाडीवर आहेत. महागठबंधनचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे २६ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे ४ उमेदवार आघाडीवर आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




