मुंबई | Mumbai
वंचित आघाडीने बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ही निवडणूक स्वबळावर न लढवता समविचारी पक्षांशी आघाडी करून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आघाडी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये महाराष्ट्रात मतांचा टक्का मोठ्या प्रमाणावर मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली. या दोन्ही पक्षांची ही आघाडी पुढे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये दिसली नाही. परंतू, बिहार विधानभा निवडणूक 2020 हे समिकरण पुन्हा दिसणार आहे. व्हीबीएचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच तशी घोषणा केली. सोबतच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र आल्यास बिहारमधील सत्तासमिकरण बदलू शकते असा दावा आकडेवारी देऊन केला आहे. त्यांनी याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे की, “वंचित बहुजन आघाडी देशात नव्या राजकारणाची सुरुवात करते आहे. महाराष्ट्रात त्याची सुरवात झाली. एमआयएमसोबत आम्ही (VBH) लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आघाडी केला. त्याचा परिणाम असा झाला की, एमआएमची एक जागा विजयी झाली. या यशाची सर्वत्र चर्चा झाली. आपेक्षा होती की विधानसभा निवडणूक 2019 मध्ये सुद्धा ही आघाडी कायम राहील. परंतू, तसे घडले नाही. एमआयएमने विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये 100 जागांची मागणी केली. आपण जाणू शकता कोणत्याही एका समाजाला इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा दिल्या जाऊ शकत नाही. परंतू हरकत नाही. जे महाराष्ट्रात चित्र दिसले नाही ते बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये दिसू शकते. आम्ही बिहार विधानसभा निवडणूक भाग घेऊ इच्छितो. बिहार विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्याचे प्रमुख ध्येय आहे एनडीए सरकारला पराभूत करणे. 16 ते 17 टक्के मुसलमान आहेत. 18 ते 19 टक्के आंबेडकरवादी आहेत. दोन्हीची संख्या विचारात घेतली तर ती 40 टक्के इतकी होते. 40 टक्के मतांच्या जोरावर आपण कोणत्याही सरकारला पराभूत करु शकतो. त्यामुळे आंबेडकरवादी, मुस्लिम, आदिवासी या शक्ती एकत्र आल्या तर एनडीए सरकारला नक्की पराभूत करु शकतो. हा सर्व समाज यावार विचार करेल असा विश्वास आहे असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.”