Wednesday, December 4, 2024
Homeनाशिकआजपासून ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’

आजपासून ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’

हक्काचे घर घेण्याची सुवर्णसंधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दै. ‘देशदूत’ आयोजित तसेच ‘हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि.’ प्रायोजित पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो 2024 च्या माध्यमातून सामान्यांचे गृह स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी ङ्गदेशदूतफने उपलब्ध करून दिली आहे. आज (दि.15) पासून पंचवटी येथील एस. एल. के. प्रॉपर्टीज, राज स्वीट्ससमोर, आरटीओ कॉर्नर, दिंडोरीरोड येथे सुरू होत असलेल्या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

- Advertisement -

हा एक्स्पो रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, नरेडको नाशिकचे संस्थापक सदस्य जयेश ठक्कर, नामको हॉस्पिटल विश्वस्त मंडळाचे सचिव शशिकांत पारख, बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर सी बी सिंह, एचडीएफसी बँकेचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर पराग रोकडे, हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक हर्षल हणमंते उपस्थित राहणार आहेत.

भविष्यातील ‘स्मार्ट सिटी’ बनण्यासाठी नाशिकची वाटचाल सुरू असतांना नाशिक शहरातील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीे विभागाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एन्डपर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते. सरकारी-निमसरकारी आस्थापना, शाळा, महाविद्यालय, आसपासच्या गावांना जोडणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोठ्या बाजारपेठा, शेतीप्रधान परिसर यामुळे रहिवासी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पंचवटी भागातील अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे.

प्रॉपर्टी एक्स्पोत हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., की स्टोन कन्स्ट्रक्शन, शेठ रियल्टी, धात्रक ग्रुप, इच्छामणी बिल्डकॉन, परम डेव्हलपर्स, रिअल बिल्डकॉन, सोमविजय कन्स्ट्रक्शन्स, ओंकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, हरी ओम ग्रुप, अनुपम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आशापुरी कन्स्ट्रक्शन, शिव डेव्हलपर्स, ओरिएंट कन्स्ट्रक्शन, ए अँड एन इन्फ्रा, आयुष बिल्डकॉन, स्वामी डेव्हलपर्स, न्यू जय अंबे प्रॉपर्टीज, आनंदग्राम, अनुभुती इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., एल.टी.बिल्डकॉन, इच्छामणी बिल्डकॉन इत्यादी नाशिक मधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात अनेक लाभदायक योजनांचा समावेश आहे. सामान्यजनांना गृह स्वप्नाची पूर्ती करण्याची अनोखी संधी ‘प्रॉपर्टी एक्स्पो’च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे.

‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक नाशिककरांचे 37 वर्षांपासून असलेले फॅमिली बिल्डर हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि. आहेत. तसेच फायनान्शिअल पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत दररोज दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी ‘देशदूत’ आयोजित पंचवटी प्रोपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या