Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशनितीशकुमारांचा टांगा पलटी ?

नितीशकुमारांचा टांगा पलटी ?

नवी दिल्ली |New Delhi

बिहार विधानसभेच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी-नितीशकुमार जोडगोळीवर तेजस्वी-राहुल ही जोडगोळी भारी पडल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त झाला आहे.

- Advertisement -

एवढेच नव्हे तर मुख्यमंत्रीपदासाठी बिहारी जनतेने तेजस्वी यादवांचा अधिक पसंती दिल्याचे दिसून आल्याने यंदा नितीशकुमारांच्या सत्तेला हादरा बसणार असल्याचे म्हटले जात आहे. 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे.

शनिवारी बिहारमध्ये तिसर्‍या टप्प्यातील मतदान झाले. त्यासोबत विविध माध्यमांचे एक्झिट पोल आले. यामध्ये बिहार निवडणुकीत मतदारांनी बदल घडवून आणण्याचा विचार केला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजपाने नितीशकुमार यांच्या मदतीने बिहारची सत्ता राखण्यासाठी कंबर कसली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक कंद्रीय मंत्री प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. तरिही बिहारचे तरूण नेतृत्व म्हणून उदयास आलेल्या आणि लालू प्रसाद यादव यांचा राजकीय वासरदार तेजस्वी यादव यांना मतदारांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

रिपब्लिक-जन की बात यांच्या एक्झिट पोलनुसार राजद-काँग्रेस महायुतीला 118 ते 138 तर सत्ताधारी एनडीएला 91 ते 117 जागा मिळतील असा अंदाज आहे. टाईम्स नाऊ-सी मतदारांच्या पाहणीत महायुती 120 जागांसह पुढे आहे. याशिवाय सत्ताधारी जेडीयू-भाजपाच्या एनडीएला 116 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या एलजेपीच्या खात्यात 1 जागा दिसते आणि अन्य पक्ष-उमेदवार 6 जागा जिंकतील अशी अपेक्षा आहे. एबीपी-सी-व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये (

बिहार विधानसभेच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी-नितीशकुमार जोडगोळीवर तेजस्वी-राहुल ही जोडगोळी भारी पडल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त झाला आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्रीपदासाठी बिहारी जनतेने तेजस्वी यादवांचा अधिक पसंती दिल्याचे दिसून आल्याने यंदा नितीशकुमारांच्या सत्तेला हादरा बसणार असल्याचे म्हटले जात आहे. 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे.

शनिवारी बिहारमध्ये तिसर्‍या टप्प्यातील मतदान झाले. त्यासोबत विविध माध्यमांचे एक्झिट पोल आले. यामध्ये बिहार निवडणुकीत मतदारांनी बदल घडवून आणण्याचा विचार केला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजपाने नितीशकुमार यांच्या मदतीने बिहारची सत्ता राखण्यासाठी कंबर कसली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक कंद्रीय मंत्री प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. तरिही बिहारचे तरूण नेतृत्व म्हणून उदयास आलेल्या आणि लालू प्रसाद यादव यांचा राजकीय वासरदार तेजस्वी यादव यांना मतदारांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

रिपब्लिक-जन की बात यांच्या एक्झिट पोलनुसार राजद-काँग्रेस महायुतीला 118 ते 138 तर सत्ताधारी एनडीएला 91 ते 117 जागा मिळतील असा अंदाज आहे. टाईम्स नाऊ-सी मतदारांच्या पाहणीत महायुती 120 जागांसह पुढे आहे. याशिवाय सत्ताधारी जेडीयू-भाजपाच्या एनडीएला 116 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या एलजेपीच्या खात्यात 1 जागा दिसते आणि अन्य पक्ष-उमेदवार 6 जागा जिंकतील अशी अपेक्षा आहे. एबीपी-सी-व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 108 ते 131 जागा तर एनडीएला 104 ते 128 जागा दिसत आहेत. याशिवाय एलजेपीला केवळ 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 4 ते 8 जागा अन्य पक्ष-उमेदवारांच्या खात्यात असल्याचा अंदाज आहे.

बिहार विधानसभेच्या सर्व 243 जागांचे मतदान पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी 28 ऑक्टोबर रोजी, दुसर्‍या टप्प्यात 94 जागांसाठी तीन नोव्हेंबरला तर तिसर्‍या टप्प्यातील 78 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या