दरभंगा । Darbhanaga
बिहारचे माजी मंत्री आणि विकासशील इंसान पार्टीचे (व्हीआयपी) राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सहनी (Mukesh Sahani) यांच्या वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आलीय.
मुकेश सहनी यांचे वडील जीतन सहनी यांची राहत्या घरी धारदार शस्त्राने वार करत हत्या केली गेली. घरात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. (Bihar News)
दरभंगा जिल्ह्यातील (Darbhanaga) सुपौल बाजार येथील सहनी यांच्या राहत्या घरी ही खळबळजनक घटना घडली. याच घरातून जीतन सहनी यांचा (Jitan Sahani) मृतदेह आढळून आला.
हे देखील वाचा : “नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज” – आ. खोसकरांचा दावा
या घटनेची माहिती मिळताच पोलीस मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. या घटने मागचं कारण अजून समोर आलेलं नाही. दरभंगा जिल्ह्याचे एएसपी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
बिहारच्या राजकारणात मुकेश सहनी यांचं अत्यंत कमी कालावधीत महत्त्व वाढलं आहे. ते विकासशील इंसान पार्टीचे अध्यक्ष आहेत. २०२० च्या निवडणुकीनंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री करण्यात आलं.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार थेट मोदीबागेत; थोरल्या पवारांची भेट की आणखी काही?
मात्र, नंतर भाजपासोबत मतभेद झाल्यानंतर ते एनडीएपासून वेगळे झाले. ते बिहार विधान परिषदेचे सदस्यही राहिलेत. निषाद समाजातून आलेले मुकेश सहनी स्वतःला ‘सन ऑफ मल्ल’ म्हणतात. राज्यात मल्ल (निषाद) समाज १२ टक्के आहे.