Saturday, November 9, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज" - आ. खोसकरांचा दावा

“नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज” – आ. खोसकरांचा दावा

नाशिक | Nashik

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress MLA) काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा करण्यात येत आहे.त्यामुळे या क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कडक कारवाई केली जाईल, असे संकेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहेत. या क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेसचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे (Igatpuri-Trimbakeshwar Constituency) आमदार हिरामण खोसकर यांच्याही नावाचा समावेश असल्याच्या बातम्या माध्यमांतून समोर आल्या होत्या.

- Advertisement -

हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा” – आमदार खोसकर

त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आमदार हिरामण खोसकर ( MLA Hiraman Khoskar) यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत यावर स्पष्टीकरण देतांना माध्यमांद्वारे सुरु असलेली माझी बदनामी वरिष्ठांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन थांबवावी. मी पक्षाने सांगितले होते त्यानुसारच मतदान केले आहे, असे खोसकर यांनी म्हटले होते. यानंतर आता खोसकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना “नाना पटोले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत, असा दावा केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील वाद आणखी उफाळण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : आगामी विधानसभा निवडणुकीत मविआ महायुतीवर पडणार भारी

यावेळी बोलतांना खोसकर म्हणाले की,”नाना पटोले (Nana Patole) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार (MLA) नाराज आहेत. मी त्यांची नावे सांगणार नाही. पण अनेक आमदारांनी नाना पटोलेंबाबत वरिष्ठ नेत्यांना तक्रार केली आहे, असे खोसकरांनी म्हटले. तसेच जर मला आगामी विधानसभेत उमेदवारी दिली नाही,तरी मी थांबणार नाही. कार्यकर्त्यांशी बोलून मला पुढची भूमिका घ्यावी लागेल”, असेही त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : बेईमान लोकांना बाहेरचा रस्ता दाखवणार; नाना पटोले प्रंचड संतापले!

पुढे बोलतांना खोसकर म्हणाले की,”विधानपरिषदेच्या निवडणुकीत मी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले आहे. याबाबत मी शपथ घेऊन सांगितले आहे, तरी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली.ज्यांची मते फुटली त्या सहा जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊन सुद्धा माझ्यावर मात्र आरोप करण्यात आला. मला उमेदवारी द्यायची नसेल तर नका देऊ, पण बदनाम करू नका. पक्षश्रेष्ठींकडून माझी बदनामी होत आहे आणि हे चांगले नाही”, असेही आमदार हिरामण खोसकर यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या