Wednesday, January 7, 2026
HomeनगरAccident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6) दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. मंगळवारी दुपारी सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास जाधव प्राथमिक आरोग्य केंद्र, रुई छत्रपती येथून कार्यालयीन कामासाठी जात असताना पिंपरी शिवारात त्यांच्या दुचाकीचा अपघात (Bike Accident) झाला.

- Advertisement -

रस्त्यावरून दुचाकी घसरून ते झाडावर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची (Accident) माहिती मिळताच रुई छत्रपती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. देवरे व डॉ. जगताप तसेच इतर सहकारी तत्काळ रुग्णालयात दाखल झाले. मात्र, त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे नेत असतानाच जाधव यांची प्राणज्योत मालवली.

YouTube video player

मूळचे लातूर (Latur) जिल्ह्यातील असलेले राम जाधव हे मागील काही दिवसांपासून रांजणगाव रोड उपकेंद्रात कार्यरत होते. अल्पावधीतच त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे सहकारी, अधिकारी तसेच गावकर्‍यांमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने आरोग्य विभागासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...