Thursday, April 30, 2026
Homeक्राईमCrime News : सराईत दुचाकी चोरटा गजाआड; चार दुचाकी जप्त

Crime News : सराईत दुचाकी चोरटा गजाआड; चार दुचाकी जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस वाढणार्‍या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास मोहिम राबवत एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत त्याच्याकडून सुमारे दोन लाख रूपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

किशोर जयसिंग पठारे (वय 45 रा. पिंपळगाव माळवी, ता. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्यांचे नाव आहे. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाची दिशा देत, रेकॉर्डवरील संशयित आरोपींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरूवारी (5 जून) गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व अंमलदार हे एकविरा चौक परिसरात गस्त करत असताना त्यांना संशयास्पद हालचाली करणारा इसम दिसला. त्याला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.

पोलिसांनी भिस्तबाग चौकात त्याला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव किशोर जयसिंग पठारे असे सांगितले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली. तपासात त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ताज्या बातम्या

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली

0
​नाशिक | प्रतिनिधी Nashik राज्य गृह विभागाने गुरुवारी (दि. ३०) भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या...