Thursday, November 21, 2024
Homeनगरचोरीची दुचाकी विकण्यास आला अन् सापळ्यात अडकला

चोरीची दुचाकी विकण्यास आला अन् सापळ्यात अडकला

चोरट्याकडून आठ दुचाकी हस्तगत || तोफखाना पोलिसांची कामगिरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmedngar

चोरीची दुचाकी विक्री (Theft Bike Sales) करण्यासाठी सावेडी उपनगरात आलेल्या चोरट्याला भिस्तबाग चौक ते सोनानगर चौक जाणार्‍या रस्त्यावर तोफखाना पोलिसांनी (Topkhana Police) सापळा लावून पकडले. किशोर जयसिंग पठारे (वय 40 रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्याकडून चार लाख 20 हजार रूपये किमतीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सुयश गोविंद नगरे (रा. हंगा, ता. पारनेर) यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून दुचाकी चोरीला (Bike Theft) गेली होती. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला असता एक संशयित भिस्तबाग चौक ते सोनानगर चौक दरम्यान चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना सोमवारी (9 सप्टेंबर) मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने सापळा लावला असता दुपारी सव्वा तीनच्या सुमारास एक संशयित व्यक्ती विना नंबरच्या दुचाकीवरून येताच त्याला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव किशोर जयसिंग पठारे असे सांगून त्याच्याकडील दुचाकी जिल्हाधिकारी कार्यालयातून चोरी (Theft) केली असल्याची कबूली दिली. तसेच नगर शहरातील विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या दुचाकी भिस्तबाग चौक, वडगाव गुप्ता रस्त्यावर लपवून ठेवल्या असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सदर ठिकाणाहून दुचाकी ताब्यात घेतल्या.

शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश पाटील, अंमलदार तनवीर शेख, सुनील शिरसाठ, दत्तात्रय जपे, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, अहमद इनामदार, सुधीर खाडे, सुरज वाबळे, वसीम पठाण, सुमित गवळी, सतीष त्रिभुवन, बाळासोब भापसे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, संदीप गिर्‍हे, राहुल म्हस्के, चेतन मोहिते, शफी शेख, नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या