Tuesday, May 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपतंगीच्या मांजाने दुचाकीस्वार जखमी

पतंगीच्या मांजाने दुचाकीस्वार जखमी

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी येथे अद्यापही पतंग प्रेमी मांजाचा उपयोग करत असून या मांजामुळे येथील वैद्यकीय व्यावसायिकाचे बोट कापून जखम झाली. मानेला मांजा लागता लागता राहिला त्यामुळे प्राण वाचले.

येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर शितल कुमार पहाडे सकाळी घरातून निघाले असता निळवंडी रस्त्यावर स्वामी समर्थ नगर लगत अज्ञात पतंग प्रेमींचा मांजा त्यांच्या गळ्याजवळ आला होता. परंतु स्कूटीवर चालत असताना त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मानेला झुकवले व हाताने मांजा दूर केला. हा मांजा बोटाला लागल्याने तीन बोटाला कापल्या गेले व जखम झाली तीन बोटांना मांजाचा धक्का बसला व बोटे कापले गेले बोटातून रक्त वाहू लागले. त्याचा अवस्थेत त्यांनी दवाखाना गाठला त्यांच्या करंगळीला आठ आठ टाके पडले.

करंगळी थोडक्यात वाचली परंतु जखम मात्र गंभीर झाली.हाच मांजा त्यांनी दूर केला नसता तर त्यांच्या मानेला दुखापत होऊन मोठी घटना घडू शकले असती. त्यामुळे आता दिंडोरी शहरात मांजाचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मांजा विक्रेत्यांवर व मांजाच्या उपयोग पतंग होण्यासाठी करत असणाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. जे जे पतंग प्रेमी आकाशात मांजाचा वापर करून पतंग उडत असतील त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून दिंडोरी शहरात दुर्घटना होणार नाही अशी मागणी होत आहे

ताज्या बातम्या

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ ५ नावांची चर्चा!

0
कोलकाता । Kolkata गेल्या अनेक दशकांतील प्रस्थापित राजकारणाला सुरुंग लावत भारतीय जनता पक्षाने बंगालच्या भूमीत एक नवा इतिहास रचला आहे. जाहीर झालेल्या निवडणूक निकालांनुसार, भाजपने...