Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यानवापूर तालुक्यात पंधरा वर्षांनी पुन्हा बर्ड फ्लू

नवापूर तालुक्यात पंधरा वर्षांनी पुन्हा बर्ड फ्लू

नवापूर | दि.६- NANDURBAR

नंदुरबार सह धुळे, अकोला, बुलढाणा, नगर या जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाल्याचा अहवाल आज सायंकाळी भोपाळच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

- Advertisement -

सन २००६ मध्येदेखील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा संसर्ग होवून लाखो कोंबडयांचा मृत्यू झाला होता.

पंधरा वर्षांनंतर पुन्हा बर्ड फ्लू ने तोंड वर काढल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांचे कोटयावधींचे नुकसान होणार आहे. कोरोनाच्या महामारीतून परिस्थिती नियंंत्रणात येत असतांनाच बर्ड फ्लूचे नवे संकट आल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, नवापूर तालुक्यातील २६ पोल्ट्री फार्म मध्ये सुमारे ९ लाख पक्षी आहेत. या सर्व पक्षांची शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

नवापूर तालुक्यात गेल्या आठवडयापासून सुमारे ३० हजार कोंबडयांचा आजाराने मृत्यू झाला होता. मात्र, संबंधीत पोल्ट्रीचालकांनी याबाबतची माहिती प्रशासनापासून लपवून ठेवली व मृत कोंबडयांची परस्पर विल्हेवाट लावली होती. परंतू नवापूर तहसिलदारांकडे याबाबत निनावी तक्रार आली होती.

त्यानंतर प्रशासनाने तपासणी केली असता सुमारे ३० हजारावर कोंबडयांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. प्रशासनातील अधिकार्‍यांनी या कोंबडयांच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी डायमंड, परवेज पठाण, आमलीवाला वसीम सह इतर पोल्ट्री फार्मच्या चौदा पक्षांचे नमुने पुणे व भोपाळ येथील लॅबला पाठवण्यात आले होते.

आज सायंकाळी या मृत कोंंबडयांच्या मृत्यूचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला होत. या कोंबडयांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

नवापूर तालुक्यातील २६ पोल्ट्री फार्म मध्ये सुमारे ९ लाख पक्षी आहेत. या सर्व पक्षांची शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पक्षांचे खाद्य मोठया प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसायिकांनी साठवून ठेवले असते त्याची पूर्णपणे विल्हेवाट लावावी लागेल.

सर्वच पोल्ट्री फार्मवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोल्ट्री फार्मचे अंडी, चिकन, पक्षी , पशुखाद्य आदी साहित्य पोल्ट्री फार्मच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

नवापूर शहरातील बर्ड फ्लु नियंत्रण साठी पशुसंवर्धन विभागाचे नाशिक, नगर, धुळे, जळगांव आदी ठिकाणाहून शंभर पथकांना पाचारण करण्यात आले आहे.

बर्ड फ्लु संदर्भात २००६ ची परिस्थितीचे अनुभव लक्षात घेता प्रशासन कुठल्याही प्रकारचा धोका घेऊ इच्छित नाही. सर्व बॉर्डरवर संचारबंदी लागू करण्यात येऊ शकते. पक्षाच्या विल्हेवाटसाठी साठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातून पोलिस बंदोबस्त करण्यासाठी साठ पोलीस कर्मचारी व वीस महिला कर्मचार्‍यांना पाचारण केले आहे. घाबरु नये ः जिल्हाधिकारी

याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी देशदूतशी बोलतांना सांगितले, नवापूर तालुक्यात गेल्या आठवडयापासून हजारो कोंबडयांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेवून नवापुरातील २२ पोल्ट्री फार्म सिल करण्यात आले होते तर एका पोल्ट्रीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबडयांचे नमुने तपासणीसाठी पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला असून कोंबडयांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमुद करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. वेगवेगळे पथक तयार करुन कोंबडयांची विल्हेवाट लावण्यासंदर्भात शासनाकडून आलेल्या सुचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये तसेच बर्ड फ्लूमुळे घाबरु जावू नये, असे आवाहनही डॉ.भारुड यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या