Thursday, May 2, 2024
Homeजळगावचाळीसगाव न.पा.त भाजपा अल्पमतात

चाळीसगाव न.पा.त भाजपा अल्पमतात

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा आशालता रमेश चव्हाण यांच्यावर अविश्‍वास ठराव आनण्यासाठी आज न.पा.ची विशेष सर्वसाधरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीलाच नगराध्यक्षा तथा सभेच्या पिठासीन अध्यक्ष आशालता विश्‍वास चव्हाण यांनी सभा स्थगीत करण्याची निर्णय घेतल्यामुळे उपनगराध्यक्षा अशालाबाई रमेश चव्हाण यांच्यावरील अविश्‍वास ठराव पारीत होऊ शकला नाही.

- Advertisement -

परंतू या सभागृहात शिवसेनेचे शहराध्यक्षा तथा नगरसेवक नाना कुमावत यांनी आम्ही भाजपाला दिलेला पाठींबा काढत असून शहवि आघाडीला पाठींबा दिल्याचे पत्रकारांना माहिती दिली. त्यामुळे आता न.पा.त भाजपा अल्पमतात आली असून भाजपाने शहविसाठी आघाडीला आडचणीत आनण्याचा डाव फसला असून तो डाव त्यांच्यावर उलटल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहेत. दरम्यान विशेष सभेत सत्ताधारी आणि शहवि आघडीमध्ये तु,तु.मै..मै.झाल्याने सभा घेण्यावरुन एकच वांदग निर्माण झाले होते. दुपारी ३ वाजेच नतंर पुन्हा सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या