Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यासुधीर मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंना साद; म्हणाले, अजूनही...

सुधीर मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंना साद; म्हणाले, अजूनही…

मुंबई | Mumbai

भाजप आणि शिवसेनेची (BJP and ShivSena) युती तुटल्यानंतर शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करत २०१९ साली महाराष्ट्रात महाविकास आघाडीसारखा न भूतो न भविष्यती असा प्रयोग करून सत्तास्थापन केली. त्यानंतर अडीच वर्ष हे सरकार टिकले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी नऊ महिन्यांपूर्वी ४० आमदारांसह (MLA) शिवसेनेतून बाहेर पडत बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले.

- Advertisement -

यानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपसोबत मिळून सत्तास्थापन केली. तेव्हापासून शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. त्यानंतर दररोज दोन्ही गटातील नेते कधी एखाद्या कार्यक्रमात तर केव्हा माध्यमांसमोर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसतात. तर दुसरीकडे भाजपचे (BJP) नेते देखील उद्धव ठाकरेंसह त्यांच्या आमदारांवर टीका करतांना दिसत आहेत.

भाजपशी पुन्हा युती करणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

त्यातच आता राज्याचे मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत मागील सरकारच्या काळातील एका वृक्षारोपण योजनेविषयी बोलताना तुफान फटकेबाजी करत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावत मैत्रीची साद घातल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, “२०१६मध्ये या योजनेला सुरुवात केली, तेव्हा उद्घाटनाला राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे नेते आले होते. उद्धव ठाकरेही आले. शरद पवार स्वत: झाड लावायला गेले”, असे त्यांनी म्हटले. तेवढ्यात समोर बसलेल्या उद्धव ठाकरेंनी “पण झाडाला फळंच नाही आली त्या”, असा टोला लगावला.

संजय राऊतांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हकालपट्टी

उद्धव ठाकरेंच्या या टोल्यानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उद्धवजी मी भेटून तुम्हाला स्वतः सांगायचो फळ येतील पण तुम्ही झाडाशी नातं तोडलं. तुम्ही झाडाशी नातं तोडलं त्याला आता मी काय करणार? मी येवून व्यक्तीगत सांगायचो की या झाडाला कोणतं खत पाहिजे, मात्र तुम्ही ते खत न टाकता दुसरंच खत टाकलं. मी एकदा नाही तीनदा विनंती केली. आजही वेळ गेलेली नाही शांततेत विचार करा, झाड वाढवायचा विचार करा असे त्यांनी सांगितले.

राऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, १८ वर्षांनंतरही…

त्यानंतर मुनगंटीवारांच्या या टिप्पणीवर उद्धव ठाकरेंनी “त्याच्याऐवजी निरमा पावडर टाकली तुम्ही”, असे म्हटले असता विरोधी बाकांवर एकच हशा पिकला होता. यानंतर पुन्हा मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला दिला. ते म्हणाले की, “खतच होतं. पण ते निरमा पाकिटात आल्यामुळे तुमचा गैरसमज झाला. आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसरं होतं आणि द्रव्य झाड जाळणारं होतं ते टाकलं. पण अजूनही काही बिघडलेलं नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा शांततेत विचार करा झाड वाढवण्याचा”, असा सूचक सल्ला मुनगंटीवारांनी यावेळी ठाकरेंना दिला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या