Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! भाजपच्या विनोद तावडेंवर नवी जबाबदारी; 'या' अभियानाच्या प्रमुखपदी निवड

मोठी बातमी! भाजपच्या विनोद तावडेंवर नवी जबाबदारी; ‘या’ अभियानाच्या प्रमुखपदी निवड

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्रासह हरियाणा आणि जम्मु काश्मीरमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. त्यातच आज दिल्लीत भाजपाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या महत्वाच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातील विनोद तावडे यांच्यावर आणखी एक महत्वाची जबाबदारी देण्यात आहे.

भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदी विनोद तावडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात भाजपचा पक्ष विस्तारासाठी भर असल्याचे दिसत आहे. भाजपच्या वतीने आजपासून सदस्यता नोंदणी अभियान सुरू केले गेले आहे, या अभियानाच्या प्रमुखपदाची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीत तावडेंवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदी विनोद तावडे यांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

सदस्यता अभियानासंदर्भात भाजपची आज महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंड राज्यातील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना गैरहजर राहता येणार आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजच्या बैठकीला दिल्लीत सहभागी होणार नाहीत. इतर प्रभारी मात्र आजच्या बैठकीत सहभागी आहेत, अशी माहिती आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...