Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVinod Tawade: 'बिनशर्त माफी मागा अन्यथा'…; विनोद तावडेंनी पाठवली राहुल गांधी, मल्लिकार्जून...

Vinod Tawade: ‘बिनशर्त माफी मागा अन्यथा’…; विनोद तावडेंनी पाठवली राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, सुप्रिया सुळेंना कायदेशीर नोटीस

मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर ५ कोटी रुपये वाटल्याचे आरोप झाले. विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये होते, त्या हॉटेलवर बहुजन विकास आघाडीचे नेते क्षीतिज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली, यानंतर मोठा गदारोळ माजला होता. हे नाट्य जवळपास दिवसभर सुरु होते. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी तावडेंवर टीका केली होती. या प्रकरणात तावडे यांनी कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्याची मागणी केली आहे.

विनोद तावडे यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत, पण विरोधकांकडून मात्र त्यांच्यावर वारंवार टीका करण्यात येत आहे. यामुळे आता विनोद तावडे यांनी विरोधी पक्षामधल्या नेत्यांना नोटीस पाठवली आहे. बिनशर्त माफी मागा अन्यथा १०० कोटींचा दावा ठोकणार, असा इशारा विनोद तावडे यांनी दिला आहे.

- Advertisement -

तावडे यांनी या कायदेशीर नोटीसबाबत माहिती दिली आहे. मी एका सामान्य मध्यमवर्ग कुटुंबातून आहे. गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. परंतू मी कशी असे काही केलेले नाही. काँग्रेसचे नेते मला, पक्षाला आणि माझ्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मुद्दामहून खोटे आरोप केले. यामुळे मी त्यांना नोटीस पाठविली असून त्यांनी सार्वजनिक रित्या माफी मागावी किंवा कारवाईला सामोरे यावे, असे यात म्हटले आहे. विनोद तावडे यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि सुप्रिया सुळे यांना नोटीस बजावली आहे.

YouTube video player

काय आहे प्रकरण?
नालासोपाऱ्यातील एका हॉटेलमध्ये तावडे उपस्थित होते. तिथे पैसे वाटप केले जात असल्याचे आरोप करत बविआचे नेते क्षितीज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचले. यावेळी तावडेंच्या आजुबाजुच्या रुममधून दाव्यानुसार १९ लाख रुपये सापडले. तर तावडेंसोबत तेव्हा उपस्थित असलेले अनेक महिला, पुरुष यांना तिथून पोलिसांनी न तपासताच बाहेर काढले होते. तावडे या हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये वाटण्यासाठी आले होते, असा दावा ठाकुर यांनी केला होता.

पोलिसानी ही सापडलेली रक्कम ९ लाखांच्या वर असल्याचे म्हटले आहे. यानंतर तावडेंनी ठाकुरांना सोबत घेऊन पत्रकार परिषदही घेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ते नंतर हितेंद्र ठाकुरांच्या गाडीतून निघूनही गेले होते. या प्रकरणात तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. अशातच तावडे यांनी हे पैसे वाटपाचे दावे फेटाळले होते. आता तावडेंनी या प्रकरणात बदनामीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....