Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshish Shelar: "उध्दव-राज ठाकरेंना फक्त हिंदू आणि मराठीच दुबार मतदार दिसला?"; व्होट...

Ashish Shelar: “उध्दव-राज ठाकरेंना फक्त हिंदू आणि मराठीच दुबार मतदार दिसला?”; व्होट जिहादवरुन आशिष शेलारांची जोरदार टीका

मुंबई | Mumbai
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मतदारयादीच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याचा मोर्चाला आज भाजपने पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. मतचोरीच्या मुद्यावर विरोधक आरडाओरड करत असले तरी वोट जिहादचा पुळका आला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून मविआच्या आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांची संख्याच जाहीर केली. मंत्री आशिष शेलार यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत मुद्दे मांडताना मविआ आणि मनसेवर आरोप केला आहे. त्यांनी म्हंटले आहे, मुद्दाम विरोधकांकडून हिंदू आणि मराठी मतदारांचाच दुबार मतदार म्हणून उल्लेख केला जात असल्याचा दावा करत हा व्होट जिहाद असल्याचे म्हटले आहे. “लोकसभेत आम्हाला विजय मिळाला हे महाविकास आघाडीने मांडले. महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख मते मिळाली. आम्हाला मिळाली २ कोटी ४८ लाख मते म्हणजे अंतर होते २ लाखांचे! त्याच लोकसभा निवडणुकांमधील ३१ मतदारसंघाची यादी पाहिली. या मोजक्या ३१ विधानसभा अल्पसंख्याक मुस्लिम दुबार मतदार ही २ लाख २५ हजार आहेत. मग तुम्ही व्होट चोरी केली? असा प्रश्न विचारायचा का?” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

नाना पटोले, रोहित पवारांचा राजीनामा मागणार का?
“ही दुबार नावे नसती तर तुमचा निकाल काय लागला असता?”असा सवाल शेलार यांनी महाविकास आघाडीबरोबरच राज ठाकरेंना विचारला. “अजून पुरावे हवे असतील तर देतो, मतदारसंघ व मतदारांची नावे राज ठाकरे तुम्ही घेतली. मी उत्तर देतो. रोहित पवार निवडून आले त्या मतदारसंघात ५ हजार मतदार हे मुस्लिम दुबार आहेत. नाना पटोले हे साकोलीतून निवडून आले २०८ मतांनी. त्याच मतदारसंघात ४०० हून अधिक मुस्लिम दुबार मतदार आहेत. त्यांचा राजीनामा मागणार का?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

YouTube video player

दिल्लीतील पप्पूपासून ते गल्लीतील पप्पूपर्यंत
“आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला मतदार-मतदारांमध्ये भेद निर्माण करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. मात्र, जे मतदारांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आम्ही उत्तर देऊ पाहत आहोत. यातून काही वेगळा अर्थ काढावा अशी आमची भूमिका नाही. मात्र, यातून जे काही आम्हाला दिसून आले ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत जो काही झटका लागला, तेव्हा दिल्लीतील पप्पूपासून ते गल्लीतील पप्पूपर्यंत सर्वजण जी भूमिका मांडत आहेत, त्याला प्रत्युत्तर देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे”, असे आशिष शेलारांनी म्हटले.

राज ठाकरेंना केवळ मराठी माणूसच दिसला का?
आशिष शेलार म्हणाले की, “काँग्रेसला लांगुनचालनाचा रोग लागलाच आहे, पण राज आणि उद्धव ठाकरे तुम्ही बोबडी यामध्ये का वळली आहे?” असा सवाल त्यांनी केला. “हिंदू – दलित दुबार मतदारांना फटकवा आणि मुस्लीम दुबार मतदार असेल तर फटाके फोडा, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडी तसेच मनसेकडून व्होट जिहाद सुरु असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला. “राज ठाकरेंनी जे मतदारसंघ सांगितले त्यामध्ये केवळ त्यांना भोईर, पाटील असेच आडनावे दिसून आली. राज ठाकरेंना दुबार मतदारांमध्ये केवळ मराठी माणूसच दिसला का? दुबार मतदारांमध्ये केवळ हिंदू लोकच दिसले का? बडवायची भाषा मराठी, दलित आणि हिंदू मतदारांसाठी वापरत आहात. उद्धव ठाकरेंची भूमिका ही भूमिपुत्रांच्या विरोधातील दिसून येत आहे.” असे म्हणत आशिष शेलार यांनी टीका केली.

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मोर्चात बोलताना म्हणाले की दुबार मतदारांना बडव-बडव बडवा. तसेच ते म्हणाले होते की टेम्पोभर पुरावे आणले. कारण आज इव्हेंटचा जमाना आहे. सध्या सर्वांनाच ‘लाव रे तो व्हिडीओ’ आवडतो. त्यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांना सांगतो की राज ठाकरे नेमके मोर्चात काय बोलले? कोणाबाबत बोलले? कोणत्या मतदारांबाबत बोलले? हे या व्हिडीओमध्ये ऐका”, असे म्हणत आशिष शेलारांनी राज ठाकरे यांच्या भाषणातील दुबार मतदारांबाबत केलेल्या विधानांचा व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला.

दुबार मुस्लिम मतदारांबाबत वेगळा न्याय
“दुबार मतदार बडवणार हे हिंदू व दलित मतदारांची नावे घेऊन सांगणार. वांद्रे पूर्व पण आहे. यातील दुबार मुस्लिम मतदारांबाबत वेगळा न्याय का? त्यांची आरती ओवाळायची का? धुळ्यात लोकसभा निवडणुकीत ३ हजार मतांनी आमचा पराभव झाला. ६७ हजार बीडमध्ये दुबार तर पंकजा मुंडेंचा पराभव ६ हजार मतांनी झाला. १६ हजार मतांनी वर्षाताई निवडून आल्या तर ३९ हजार दुबार मतदार आहेत. वर्षाताई राजीनामा देणार का?” असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.

मविआच्या कोणत्या आमदाराच्या मतदारसंघात दुबार मतदार?
रोहित पवार
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ
रोहित पवार जिंकले 1243 मतांनी. पण, त्यांच्या या मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदारांची संख्या आहे 5532.
नाना पटोले
साकोली विधानसभा मतदारसंघ
नाना पटोले जिंकले 208 मतांनी. पण, त्यांच्या मतदारसंघात 477 दुबार मते ही मुस्लिमांची
वरुण सरदेसाई
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ
वरुण सरदेसाई जिंकले 11,365 मतांनी. पण, त्यांच्या मतदारसंघात 13,313 हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आहेत.
बीड विधानसभा : संदीप क्षीरसागर
जिंकले 5324 मतांनी/ 14,944 दुबार मुस्लिम मते
मुंब्रा विधानसभा: जितेंद्र आव्हाड
30,601 दुबार मुस्लिम मते
माळशिरस विधानसभा : उत्तम जानकर
4399 दुबार मुस्लिम मते
घनसावंगी विधानसभा : राजेश टोपे
11,751 दुबार मुस्लिम मते
केवळ 2309 मतांनी येथे शिवसेना निवडून आली.
लातूर शहर : अमित देशमुख
20,613 दुबार मुस्लिम मते
धारावी : ज्योती गायकवाड
10,689 दुबार मुस्लिम मते
मुंबादेवी : अमीन पटेल
11,126 दुबार मुस्लिम मते
उत्तर नागपूर : नितीन राऊत
8342 दुबार मुस्लिम मते
मालाड पश्चिम : अस्लम शेख
17,007 दुबार मुस्लिम मते, ते जिंकले 6227 मतांनी.
परभणी : राहुल पाटील
13,313 दुबार मुस्लिम मते
विक्रोळी : सुनील राऊत
3450 दुबार मुस्लिम मते. किमान सुनील राऊतांकडून ही अपेक्षा नव्हती.
कलिना : संजय पोतनीस
6973 दुबार मुस्लिम मते, जिंकले 5008 मतांनी
जोगेश्वरी पूर्व : अनंत नार
6441 दुबार मुस्लिम मते, जिंकले 1541 मतांनी
बाळापूर : नितीन देशमुख
5251 दुबार मुस्लिम मतदार
दिंडोशी : सुनील प्रभू
5347 दुबार मुस्लिम मते, 6182 मतांनी जिंकले
धाराशिव : कैलास पाटील
11,242 दुबार मुस्लिम मते

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...