Thursday, May 2, 2024
Homeराजकीयसत्ताधाऱ्यांनी राज्याची अस्मिता वेशीवर टांगली; विखे पाटलांचा घणाघात

सत्ताधाऱ्यांनी राज्याची अस्मिता वेशीवर टांगली; विखे पाटलांचा घणाघात

राहाता l तालुका प्रतिनिधी

सत्तेत राहण्यासाठी मुख्यमंत्री आणखी किती तडजोडी करणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात राज्याच्या अस्मितेची तख्तरे वेशीला टांगली जात आहेत. पूजा चव्हाण

- Advertisement -

आत्महत्याप्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव आलंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणी प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी माजी मंत्री भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय.

यावेळी बोलताना विखे म्हणाले, पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव आलंय. ऑडिओ क्लीप त्यांची समोर आलीय अशावेळी या मंत्र्यांचा राजीनामा घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

तसेच बोलतांनी त्यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सध्या सत्तेत काॅग्रेसचं अस्तित्वच राहीलं नाहीए त्यामुळे काॅग्रेसच्या इशाऱ्याची आता कोणी चिंता करत नाही. सत्तेचा रिमोट शिवसेनेकडे नाही तर तो दुसर्याच्या हाती आहे. काॅग्रेसचे तर सत्तेत अस्तित्व नाही त्यामुळे आता काँग्रेसने इशारा द्यायचं सोडून द्यावं लाचारी पत्करून सत्तेत राहण्यापेक्षा काँग्रेसने सत्तेबाहेर पडावं असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला लगावला. काॅग्रेसमुळे राज्य सरकार असल्याच्या अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर विखेंनी हा टोला लगावला.

दरम्यान, राज्यातील वीज बिलाच्या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले, विजतोडणीचे महान कार्य सध्या सरकार करतंय अगोदरच राज्यातील जनता आणी शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा हा प्रकार आहे . उर्जा मंत्र्यांची मोफत विज देण्याची घोषणा केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी होती आज धाकडपशाहीने दहशतीने विज बिल वसूली केली जात असून सरकार आपल्या घोषणा विसरलंय.सरकारने विज तोडणी त्वरीत थांबवावी अन्यथा भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

तसेच, शिवजयंतीसाठी नियमावली बनवणं राज्याच्या अस्मितेला धक्का आहे मंत्री मोकाट फिरताहेत मोठाले कार्यक्रम होत आहेत, तीथे मात्र नियम नाहीत. मात्र ज्यांच्या आशिर्वादाने तुम्ही सत्तेत आलात त्यांच्या जयंतीला मात्र नियमावली केली गेलीय. राज्यातील जनतेला चिड आणणारा निर्णय असून नियमावली त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या