Monday, March 31, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSuresh Dhas : वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण का झाली? सुरेश...

Suresh Dhas : वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण का झाली? सुरेश धसांच्या दाव्यामुळे खळबळ

बीड | Beed

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात (Murder Case) बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले (Walmik Karad and Sudarshan Ghule) यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांना महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचे बोलले जात आहे. कराड आणि घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. अशातच आता याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना धस म्हणाले की, “मला या प्रकरणाची माहिती आहे. महादेव गिते आणि अक्षय आठवले (Mahadev Gite and Akshay Athawale) यांनी ही मारहाण केलेली आहे. महादेव गिते याला अटक (Arrested) होण्यापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल केलेला आहे. मला खोट्या गुन्ह्यात कसं गुंतवलं हे सांगून मग तो जेलमध्ये गेला आहे. इतरांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचे, कोणाला खोट्या प्रकरणात अडकवायचे, अशा सर्व प्रकरणामुळे त्यांना मारहाण झाली असून कोणत्याही वस्तूने मारण्यात आलेले नाही”, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, “परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात (Murder Case) वाल्मिक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांचा दावा आहे. याच रागातून महादेव गित्ते याने आता तुरुंगात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचे मला कळाले. याची अधिक माहिती घेण्यासाठी मी आता बीड कारागृहाकडे जात आहे,” अशी माहितीही धस यांनी दिली.

तसेच “जोपर्यंत बबन गित्तेला (Baban Gite) संपवत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ वाल्मीक कराडने घेतली होती आणि जोपर्यंत कराडचा खून करत नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही, असा निश्चय बबन गित्तेने केला होता, असेही त्यांच्या जवळचे लोक सांगतात”, असंही सुरेश धस यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sonia Gandhi: “भारतातील शिक्षण व्यवस्थेची हत्या थांबवा”; सोनिया गांधींनी केंद्र सरकारला...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भारताच्या शिक्षण धोरणावरुन मोदी सरकारवर शाब्दीक हल्ला चढवला आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय...