Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार

पुणे | Pune

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

- Advertisement -

बृजभूषण सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत (Sharad Pawar) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. दरम्यान मनसेकडून त्यांना कोणताही विरोध होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला विरोध करु नका, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्यावर वसंत मोरे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

राज ठाकरे यांचा जून महिन्यातील अयोध्या दौऱ्याला त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे आयोध्येला जाऊ शकले नव्हते. त्यावेळी बृजभूषण सिंह आणि राज ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाले होते. मनसेने त्यांच्या भूमिकेचा विरोध केला होता. त्यामुळे मनसेच्या भूमिकेवर लक्ष होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या