Thursday, May 2, 2024
Homeराजकीयभाजप खासदार नारायण राणे करोनाबाधित

भाजप खासदार नारायण राणे करोनाबाधित

मुंबई | Mumbai

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच, पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवेत कार्यरत कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांनाही करोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता भाजप खासदार नारायण राणे (BJP MP Narayan Rane) करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.

- Advertisement -

नारायण राणे यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.”

दरम्यान या आधी नारायण राणे यांचे चिरंजीव, माजी खासदार निलेश राणे यांनाही काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर निलेश राणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेट झाले होते. उपचार घेतल्यानंतर निलेश राणे हे पूर्ण बरे झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या