Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशभाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना करोनाची लागण

भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना करोनाची लागण

नवी दिल्ली –

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना करोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.

- Advertisement -

करोनाची लक्षणं दिसत असल्याने मी करोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे. माझं हे आवाहन आहे की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. असं आवाहन जे. पी. नड्डा यांनी केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या