Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याबाबरीच्या 'हजेरी'वरुन जुंपली; फडणवीस-राऊतांचे आरोप-प्रत्यारोप

बाबरीच्या ‘हजेरी’वरुन जुंपली; फडणवीस-राऊतांचे आरोप-प्रत्यारोप

मुंबई | Mumbai

बाबरीचा (Babri Masjid) ढाचा पाडला तेव्हा एकही शिवसैनिक (Shivsainik) तेथे नव्हता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. त्यावर सेनेचे (Shivsena) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती असा प्रश्न पडला असेल तर आपल्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारी (Sunsersingh Bhandari) यांना विचारावं, असा टोला त्यांनी लगावला आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी राऊत यांनी बाबरी पाडली तेव्हा कोणत्या बिळात लपले होते, असा सवाल भाजपला केला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता. आम्ही अभिमानाने सांगतो की तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं. हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्यासाठी त्या ठिकाणी होता, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

‘प्रार्थना’चं निखळ सौंदर्य हिरव्या पैठणीत खुललं, पाहा PHOTO

त्यानंतर राऊतांनी पुन्हा टीका केली. किती काळ तुम्ही बाबरीच्या विषयावर बोलणार आहात. देशात महागाई, बेरोजगारी, चीनने केलेली घुसखोरी यावरुन लक्ष हटवण्यासाठी हनुमान चालीसा आणि बाबरीच्या मुद्द्यावर भाजपा आणि त्यांच्याशी संबंधित पक्ष बोलत आहे. देशात बेरोजगारी किती वाढली आहे. महागाई किती वाढली आहे, ते पहा असा खोचक सल्ला राऊत यांनी भाजपला दिला.

बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती असं कोणी विचारत असेल तर त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारी यांना विचारावं. त्या काळातील सीबीआयचा अहवाल तपासा. सीबीआयने तपास केला आहे. सीबीआयाने केलेल्या तपासाची पानं आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. शिवसेना कुठे आहे असं विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेल, असं प्रत्युत्तर राऊत यांनी फडणवीसांना दिलं आहे.

VISUAL STORY : राज ठाकरेंच्या भाषणावर काय म्हणताय राज्यातील नेते?

दरम्यान फडणवीसांनी तुम्ही रामाच्या बाजूने आहात की रावणाच्या अशी विचारणा केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. त्यांनी रावणाचाही इतिहास वाचला पाहिजे. रावणाचा अंत अहंकाराने झाला. रावण त्याच्या अहंकारामुळे धारातीर्थी पडला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो तर काहींना सत्ता गेल्यानंतही अहंकार येतो. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला आहे त्याचा अंत करावा आणि नंतर महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं.

- Advertisment -

ताज्या बातम्या