Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याChandrashekhar Bawankule : "आपल्या विरोधात बातम्या येऊ म्हणून पत्रकारांना..."; बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना अजब...

Chandrashekhar Bawankule : “आपल्या विरोधात बातम्या येऊ म्हणून पत्रकारांना…”; बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

मुंबई | Mumbai

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) देखील महाराष्ट्रातून (Maharashtra) ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) भारतीय जनता पक्षाच्या ‘महाविजय २०२४ लोकसभा प्रवास’ या ‘घर चलो अभियान’साठी सध्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. काल बावनकुळे यांनी ‘घर चलो अभियाना’च्या निमित्ताने अहमदनगरमध्ये (Ahmednagar) पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या अभियानाची कार्यशाळा घेतली. त्यानंतर आज ते नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आहेत. यावेळी त्यांनी नगरमध्ये बोलतांना बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांना “आपल्या विरोधात बातम्या येऊ नयेत, यासाठी काय काळजी घ्यावी, याविषयी अजब सल्ला दिला आहे…

- Advertisement -

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना जीएसटी आयुक्तालयाचा दणका; वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

ते म्हणाले की, २०२४ ची लोकसभा निवडणूक होईपर्यंत एकही बातमी आपल्या विरोधात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या या अभियानाच्या सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत. त्यासाठी आपण ज्या बुथवर काम करतो, तेथील सर्व पत्रकारांची (Journalists) माहिती मिळवा. त्या भागातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, स्वत:चे पोर्टल चालविणारे पत्रकार हेही पहावेत. आपण एवढे चांगले काम करत असताना ते जणू बॉम्बस्फोट झाल्यासारखी बातमी देतात. त्यामुळे आपल्या बुथच्या हद्दीत जे कोणी चार-पाच पत्रकार असतील त्यांची यादी तयार करा. त्यात सगळ्या मीडियाचे येतील असे पहावे. त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे काय करायचे ते समजलेच असेल. त्यात काही कमी जास्त झाले तर मदतीला खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) आहेतच, असेही बावनकुळे यांनी म्हटले होते.

Video : “आम्हाला नाही, तर तुम्हाला नाही”; थकीत वेतनासाठी निसाका कामगारांचे गांधीगिरी मार्गाने भजन आंदोलन

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट (Facebook Post) लिहित म्हटले आहे की, विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला (BJP) हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे ही विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌, असे त्यांनी म्हटले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

संजय राऊत, दानवेंच्या अडचणी वाढणार? नीतेश राणेंची थेट विधिमंडळ सचिवांकडे तक्रार

- Advertisment -

ताज्या बातम्या