Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBMC Elections: सर्व्हे भाजपचा, मात्र चलती शिंदेसेनेची; मुंबईतील मुस्लीमबहुल भागात एकनाथ शिंदेंना...

BMC Elections: सर्व्हे भाजपचा, मात्र चलती शिंदेसेनेची; मुंबईतील मुस्लीमबहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती, काय आहे रिपोर्ट?

मुंबई | Mumbai
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जायचे असं भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात एकमत झाले आहे. गुरुवारी रात्री भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल २ तास चर्चा झाली. या भेटीनंतर महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यातच भाजपाने केलेल्या सर्व्हेचा रिपोर्ट समोर आला आहे. मुंबईकरांसाठी घेतलेल्या एका निर्णयामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी आज केली.

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोबत बातचित केली. यावेळी त्यांनी मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असल्याची चर्चा सुरु झाली असल्याचे म्हटले.

- Advertisement -

भाजपच्या सर्व्हेत एकनाथ शिंदेंना पसंती
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीवर चर्चा सुरु असताना मुंबई महानगरपालिकेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भाजपाच्या एका सर्व्हेमध्ये मुस्लिम बहुल भागात भाजपला विरोध होत असून एकनाथ शिंदेंना पसंती मिळत असल्याचे समोर आले आहे. भाजपाच्या या सर्व्हेत मुंबईतील १८ वॉर्डमध्ये ७० टक्के मुस्लिम बहुल भागात भाजपला विरोध होत असला. तरी एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती असल्याचे निदर्शनास दिसून आले. या १८ वॉर्डात एकनाथ शिंदेंनी उमेदवार दिला तर त्याचा फायदा पक्षाला होईल, कारण एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणचा प्रभाव हा मुस्लिम महिलांमध्ये आहे.

YouTube video player

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
तर या सर्व्हेबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या जागांबाबत काही चर्चा नाही. आम्ही ज्या योजना आणल्या त्यात कुठेही भेदभाव केला नाही. सर्वसमावेशक अशा योजना आम्ही राबवल्या. विकास करतानाही काही फरक केला नाही. लोकाभिमुख कल्याणकारी लाडकी बहीण योजना आणतानाही आम्ही कुठेही भेदभाव केला नाही असे शिंदे यांनी म्हटले आहे.

ठाकरेंवर निशाणा
या योजनेमुळे पागडी आणि मालक यांना इमारत पुनर्विकासासाठी अभय मिळणार आहे असे धोरण आम्ही ठरवले आहे. पागडीमुक्त मुंबई ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती, ती आम्ही मान्य केली आहे. पागडीमध्ये राहणारे बिल्डर नाही तर सर्वसामान्य आहेत. ज्यांना फक्त बिल्डरांची भाषा समजते त्यांच्याकडून याला विरोध होत आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिक अडथळा ठरत आहेत. युतीबाबत भाजपा आणि शिवसेना याच्यात बैठकांचं सत्र सुरू असताना दादांच्या राष्ट्रवादीचा कुठेही सहभाग दिसत नाही.अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मुंबईचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे सोपवलं आहे, ज्याला भाजपाचा कडाडून विरोध आहे. मुंबईचं राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिक यांच्या ऐवजी इतर कुणाकडेही दिल्यास भाजपाच्या नेत्यांचा कुठलाही आक्षेप नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. लवकरच महायुतीतील तिसरा महत्वाचा पक्ष राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबत महायुतीत हालचाली सुरू आहे.

महायुती म्हणूनच निवडणूक मजबूतीने लढेल
महाराष्ट्रात मुंबईसह 29 महापालिकांची निवडणूक लवकरच घोषित होईल. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे), भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित लढण्याची चर्चा आता सुरु झाली आहे. स्थानिक पातळीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या एकमेकांशी चर्चा करतील, असे सांगत एकनाथ शिंदे म्हणाले की, जिथे कुठे अडचण निर्माण होईल. तिथे वरिष्ठ नेते सहभागी होऊन अडचण दूर करतील. आता महायुती संदर्भात चर्चा सुरु झाली आहे. महायुती आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढेल आणि मजबूतीने लढेल, असे शिंदे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...