पुणे । Pune
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्षशिस्त भंग करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या पुण्यातील ६९ कार्यकर्त्यांवर भाजपने कडक कारवाई केली असून, त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या काळात पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली होती. यापैकी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त धाब्यावर बसवून अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. या बंडखोरीचा फटका पक्षाला बसल्याचे निदर्शनास आल्यानंतर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांविरुद्ध जाऊन काम केले, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षाच्या कोणत्याही संघटनात्मक जबाबदारीतून किंवा पदावरून मुक्त करण्यात आले आहे. “पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही,” असा स्पष्ट आणि ठाम संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर भाजपने घेतलेला हा निर्णय आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पक्षांतर्गत शिस्त मजबूत करण्यासाठी आणि भविष्यात अशा प्रकारची बंडखोरी रोखण्यासाठी ही ‘भाकरी’ फिरवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने जाहीर केलेल्या अधिकृत यादीत पुण्यातील अनेक सक्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ज्या ६९ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे, त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. श्री धनंजय जाधव, २. श्री चंद्रकांत पाटे, ३. सौ कादंबरी साळवी, ४. श्री जितेंद्र टकले, ५. श्री किशोर तरवडे, ६. श्री अमोल बालवडकर, ७. श्री सोमनाथ गुंड, ८. सौ मानसी सोमनाथ गुंड, ९. सौ अनिता तळाठी, १०. सौ पल्लवी गाडगीळ, ११. श्री दत्ता भगत, १२. श्री विनोद मोहिते, १३. श्री रमेश भंडारी, १४. श्री समाधान शिंदे, १५. श्री मधुकर मुसळे, १६. श्री प्रकाश डोरे, १७. श्री बाळासाहेब सानवडे, १८. सौ मंजू वाघमारे, १९. सौ प्रीती वालकर, २०. श्री संदीप लोणकर, २१. सौ स्मिता गायकवाड, २२. श्री संतोष शिंदे, २३. श्री युवराज कुञ्जेकर, २४. श्री इफ्तियाज मोमीन, २५. श्री अप्पणा दादावाडकर, २६. श्री पुरुषोत्तम अप्पणा दादावाडकर, २७. अभिजीत उपाध्ये, २८. सौ छाया गवळी, २९. श्री नवल कुसाळ, ३०. श्री समीर पठाण, ३१. श्री प्रणव मोरे, ३२. श्री योगेश सूर्यवंशी, ३३. सौ अर्चना योगेश सूर्यवंशी, ३४. सौ नलिनी मोरे, ३५. सौ संगिता ठोसर, ३६. श्री अनिल मेमाणे, ३७. श्री नितीन मारकड, ३८. श्री सतीश मारकड, ३९. सौ वर्षा मारकड, ४०. श्री रुपेश धुले, ४१. श्री बापू पोकळे, ४२. श्री किरण वाळुंज, ४३. श्री अमोल रायकर, ४४. श्री संदीप पोकळे, ४५. मोहिनी देवकर, ४६. रितेश रासकर, ४७. सचिन दशरथ दांगट, ४८. सुरेंद्र कांबळे, ४९. श्री संदीप जन्हाड, ५०. सौ सुनीता गलांडे, ५१. श्री किशोर वाघमारे, ५२. श्री विजय चौगुले, ५३. श्री अकबर पठाण, ५४. श्री राजू साखरे, ५५. सौ ऐश्वर्या जाधव, ५६. श्री जितेंद्र जगताप, ५७. श्री प्रविण खेडकर, ५८. सौ स्मिता खेडकर, ५९. सौ उज्वला गोडे, ६०. श्री बाळासाहेब घोडके, ६१. श्री सुरेश धनगर, ६२. सौ स्वाती धनगर, ६३. सौ सुवर्णा भरेकर, ६४. सौ पल्लवी केदारी, ६५. श्री राहुल रामे, ६६. श्री हरीष परदेशी, ६७. श्री बंडू जाधव, ६८. सौ नीता थोरवे, ६९. श्री प्रीतम नागापुरे.
पुणे शहराध्यक्षांनी आणि जिल्हाध्यक्षांनी या कारवाईबाबत बोलताना सांगितले की, पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला पाठीशी घातले जाणार नाही. ही कारवाई तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर पावले उचलली जातील. भाजपच्या या मोठ्या कारवाईमुळे बंडखोर गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर दुसरीकडे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये शिस्तीचा सकारात्मक संदेश गेल्याचे बोलले जात आहे. आगामी राजकीय समीकरणे या निर्णयामुळे कशी बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





