Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशबिहार निवडणुका संपून २४ तासही उलटत नाही तोच भाजपाने थेट माजी केंद्रीय...

बिहार निवडणुका संपून २४ तासही उलटत नाही तोच भाजपाने थेट माजी केंद्रीय मंत्र्यांना केलं निलंबित…काय आहे नेमकं कारण?

बिहार | Bihar
बिहारमधील निवडणूका संपून २४ तासही उलटत नाही तर भाजपने राज्यातील बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने पक्षविरोधी कारवायांसाठी जबाबदार धरत तीन नेत्यांना निलंबित केले आहे. बिहारमधील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आर के सिंह यांचा समावेश आहे. पक्षाच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या इतर दोन नेत्यांमध्ये विधान परिषद सदस्य अशोक अग्रवाल आणि कटिहारच्या महापौर उषा अग्रवाल यांचा समावेश आहे.

माजी केंद्रीय मंत्री आर के. सिंह यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाने त्यांना नोटीस पाठवली आहे. यात त्यांनी पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप करत स्पष्टीकरण मागितले आहे. आर के. सिंह हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षीय कार्यात सक्रीय नव्हते. त्यांची वागणूकीवरूनच ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

“तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात. हे शिस्तीच्या कक्षेत येते. पक्षाने हे गांभीर्याने घेतले आहे. यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. म्हणून, तुम्हाला पक्षातून निलंबित केले जात आहे आणि तुम्हाला पक्षातून का काढून टाकू नये याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले जात आहे. कृपया हे पत्र मिळाल्यापासून एका आठवड्याच्या आत तुमची भूमिका स्पष्ट करा,” असे सिंह आणि अग्रवाल यांना पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीशीत लिहिण्यात आले आहे.

YouTube video player

निवडणुकीदरम्यान, आर के. सिंह यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर काही प्रश्न उपस्थित केले होते. तारापूर येथे त्यांनी जनतेला सम्राट चौधरी यांना मतदान करून नये, असे आवाहन केले होते. अनंत सिंह, विभा देवी यांसारख्या वादग्रस्त आणि कलंकित व्यक्तींना तिकिटे देण्याच्या एनडीएच्या निर्णयावरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. तसेच शहाबाद मतदारसंघातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनाही ते गैरहजर राहिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...