राहुरी । प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने गड राखला असून नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या 15 जागांवर भाजपने विजय मिळवला असून काँग्रेसला 4, शिवसेनेला 1, वंचित बहुजन आघाडीला 1 जागेवर समाधान मानावे लागले. सत्ताधारी भाजपाचे सत्यजित कदम यांनी जवळपास 6 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाचे नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार सत्यजित कदम हे दुसर्यांदा मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. व नगसेवक पदाच्या 15 जागा जिंकून भाजपाला बहुमत मिळाले असले तरी या निवडणूकीत वंचित बहूजन आघाडीचे संतोष चोळके यांच्या विजयाने नगरपरिषदे मध्ये वंचितचे पहिल्यांदा खाते उघडले तर प्रभाग क्र.1 मधून शिवसेनेच्या (शिंदे गट) आशाताई केदारनाथ चव्हाण या एकमेव उमेदवार निवडून आल्या आहेत. 25 वर्षानंतर काँग्रेस महाविकास आघाडीने नगरपरिषद निवडणूकीत चार जागा जिकंल्या या निवडणूकीत सर्वसामान्य उमेदवारांना जनतेने निवडून देऊन लोकशाही जिवंत असल्याने उदाहरण दाखवून दिले. त्याच प्रमाणे भाजपाचे सर्वात कमी वयाचे उमेदवार सौरभ विजय मुसमाडे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे येथिल मतदार सुज्ञ असल्याचे समोर आले आहे.
तसेच सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीसह, शिवसेना व वंचित बहूजन आघाडीला सत्तेत पाठविले आहे. या निवडणूकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार सविता उंडे यांना प्रतिस्पर्धी उमेदवारा पेक्षा अवघी तेरा मते कमी पडली तर प्रभाग क्र.9 मधील महिला उमेदवार ज्योती गिरमे यांना प्रतिस्पर्धी उमेदवारा पेक्षा अवघी अकरा मत पडली. या दोन्ही ठिकाणची फेरमतमोजणी करण्यात आली, परंतु त्यामध्ये काही ही फरक न झाल्याने आघाडीच्या दोन उमेदवारांना निसटता पराभव स्विकारावा लागला.
देवळाली प्रवरा सार्वत्रिक निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार व त्यांना पडलेले मतदान पुढिल प्रमाणे सत्यजित चंद्रशेखर कदम (भाजपा 10414 विजयी), कृष्णा नानासाहेब मुसमाडे (काँग्रेस 4724), आश्विनी चंद्रकांत दोंदे (बसपा 132) कडून बाबासाहेब भाऊसाहेब मुसमाडे,( शिवसेना 2897), अॅड. प्रसाद रामकृष्ण सांगळे (वंचित 278), नोटा-86 अशी मते मिळाली. ही लढत बहूरंगी झाली. तसेच नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. 1 (अ)- ज्योती नितीन येवले (भाजपा 1114), आशाताई केदारनाथ चव्हाण (शिवसेना 1166 विजयी), नोटा- 67, प्रभाग क्र. 1 (ब)-अनिल साहेबराव चव्हाण (काँग्रेस 645), आबासाहेब बापू कदम (वंचित आघाडी 85), ज्ञानदेव धोंडीराम तारडे (शिवसेना 137), अजित बाजीराव चव्हाण (भाजपा 1448 विजयी). नोटा-32, प्रभाग क्र. 2 (अ)- गणेश पांडुरंग मुसमाडे (भाजपा 775), तुकाराम भीमराज पठारे (काँग्रेस 1004 विजयी), प्रशांत बापूसाहेब कदम (शिवसेना 221), नोटा-22, प्रभाग क्र.2 (ब)- मनीषा सुर्यकांत कदम (भाजपा 822 विजयी), सविता नानासाहेब उंडे (काँग्रेस 806), सुरेखा अशोक मुसमाडे (शिवसेना 365). नोटा-26, प्रभाग क्र. 3 (अ)- सीमा सुभाष देठे (भाजपा 906 विजयी), कविता किशोर पंडित (काँग्रेस 574), साधना अनिल शेंडगे (शिवसेना 640). नोटा-26, प्रभाग क्र. 3 (ब)- सौरभ विजय मुसमाडे (भाजपा 861 विजयी), अशोक सूर्यभान खुरुद (काँग्रेस 513), प्रशांत शिवाजी मुसमाडे (शिवसेना 744), शिवाजी रघुनाथ मुसमाडे (वंचित आघाडी 17). नोटा- 11
प्रभाग क्र. 4 (अ)- सुनिता सुरेंद्र थोरात (काँग्रेस 1483 विजयी), पूजा सचिन घोरपडे (भाजपा 1044), सविता रविंद्र सरोदे (शिवसेना 92). नोटा-51, प्रभाग क्र. 4 (ब)- सुवर्णा प्रविण कोठुळे (भाजपा 1490 विजयी), विश्वास दादासाहेब पाटील (काँग्रेस 1094), कारभारी जगन्नाथ होले (74), नोटा-12, प्रभाग क्र.4 (क)- सिंधुबाई तान्हाजी वाळूंज (भाजपा 1337 विजयी), सुजाता संजय मुसमाडे (काँग्रेस 1112), शोभा बाळासाहेब कराळे (शिवसेना 173), नोटा- 48, प्रभाग क्र. 5 (अ)- भारत रावसाहेब शेटे (भाजपा 473), महेश संजय मोरे (शिवसेना 283), संतोष एकनाथ चोळके (वंचित आघाडी 601 विजयी), सोमनाथ सोनाजी खांदे (काँग्रेस 256), नोटा- 9,
प्रभाग क्र. 5 (ब)- पुष्पा आदिनाथ तांबे (भाजपा 700 विजयी), स्वाती सुनिल कराळे (शिवसेना 413), जयश्री गोरक्षनाथ सांबारे (काँग्रेस 490). नोटा-19 प्रभाग क्र. 6 (अ) ज्योती जयेश माळी (164), बेबी संजय बर्डे (भाजपा 1107 विजयी), कल्पना प्रमोद बर्डे (शिवसेना 648). नोटा- 29, प्रभाग क्र. 6 (ब)- वसंतराव तान्हाजी कदम (काँग्रेस 217), अमोल मुरलीधर कदम (भाजपा 950 विजयी), अनंत कृष्णराव कदम (शिवसेना 768). नोटा-13, प्रभाग क्र. 7 (अ)- प्रकाश मार्शल संसारे (भाजपा 901 विजयी), अक्षय निवृत्ती पवार (90), चैतन्य दगडू आल्हाट (349), अजय भाऊसाहेब पगारे (शिवसेना 302), राजेंद्र अशोक साळवे (61), नोटा- 25, प्रभाग क्र. 7 (ब)- अर्चना मनोज भोंगळ (भाजपा 571), मंदा बाळासाहेब कोकरे (शिवसेना 257), पल्लवी वैभव ढुस (काँग्रेस 793 विजयी), कुसुमताई बबन निमसे (94). नोटा-13, प्रभाग क्र. 8 (अ)- सुजाता सुधाकर कदम (भाजपा 1050 विजयी), तृप्ती सुनिल विश्वासराव (काँग्रेस 364), ममता युवराज लहांगे (शिवसेना 219). नोटा- 16 प्रभाग क्र. 8 (ब)- राजेंद्र मुरलीधर लोखंडे (भाजपा 834 विजयी), सुनिल पंडित विश्वासराव (काँग्रेस 248), आदिनाथ रंभाजी कराळे (शिवसेना 554), नोटा-16
प्रभाग क्र. 9 (अ) चंदाराणी वैभव गाडे (भाजपा 565 विजयी), वैशाली किशोर कोबरणे (शिवसेना 408), ज्योती वैभव गिरमे (काँग्रेस 553), नोटा-13, प्रभाग क्र. 9 (ब)- प्रशांत रामचंद्र काळे (काँग्रेस 641), वसंत कुंडलीक कदम (भाजपा 715 विजयी), बापूसाहेब तुकाराम मुसमाडे (शिवसेना 166). नोटा-17,
प्रभाग क्र. 10 (अ)- जयश्री शरद खांदे (भाजपा 395 विजयी), सोनाली सचिन खांदे (शिवसेना 283), निकिता संजय कदम (काँग्रेस 173). नोटा-6 प्रभाग क्र. 10(ब)- तुषार नंदू शेटे (भाजपा 261), दिपक आप्पासाहेब शेटे (शिवसेना 254), शरद कारभारी वाळूंज (काँग्रेस 331 विजयी) नोटा-11, अशी आहे.
या निवडणूकीत भाजपा, काँग्रेस, महाविकास आघाडी व रिपाई, शिवसेना (शिंदे गट) आणि वंचित बहूजन आघाडी अशी लढत झाली होती. पहिल्या फेरी पासूनच भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सत्यजित कदम हे आघाडीवर होते. निवडणूकीचा निकाल लागताच विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष व्यक्त केला.
नगरपरिषदेची निवडणूक 20 दिवस पुढे गेली, तरी आमचे उमेद्वार व कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. आमचा पुर्ण पँनेल उभा होता. भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविली.नगरवाशियांनी विचार करुन मतदान केले. आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून जनतेने नगराध्यक्षासह 15 जागा निवडून देऊन आम्हाला बहुमत दिले त्या बद्दल मी जनतेचे आभार मानतो. पुढे ही विकास कामासाठी सर्वांनी सहकार्य करावे
– माजी आ. चंद्रशेखर कदम




