Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरवींद्र चव्हाणांना मोठा धक्का; भाजप युवा नेत्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

रवींद्र चव्हाणांना मोठा धक्का; भाजप युवा नेत्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतराला वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये भाजपचे युवा नेत्याने प्रवेश केला असून . या घडामोडीतून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचेचित्र आहे.

YouTube video player

डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांनी भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आणि रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे योगेंद्र भोईर यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपच्या गोटात खळबळ उडवली आहे. योगेंद्र भोईर यांनी आपल्या पत्नी ट्विंकल भोईर यांच्यासह मातोश्रीवर हजर राहून अधिकृतपणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये प्रवेश केला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत करत पक्षात सक्रिय भूमिका पार पाडण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, उपनेते व संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने, डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे या प्रवेशाला स्थानिक पातळीवरही मोठे महत्त्व प्राप्त झाले.

प्रवेशानंतर योगेंद्र भोईर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की,बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि प्रगतीसाठी जीवनात अनेक वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. आज मी असा एक कठीण निर्णय घेतला असून भाजप परिवारातून बाहेर पडत आहे. तसेच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आदर व्यक्त करत,चव्हाण साहेब माझे दादा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला अनेक नवे अनुभव आणि शिकवणी मिळाली. त्यांचा सहवास माझ्या राजकीय प्रवासात नेहमीच प्रेरणादायी राहील,असेही त्यांनी नमूद केले.

या घडामोडीमुळे डोंबिवलीच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या संघटनात्मक मजबूत गडात असलेल्या युवक नेत्याचा इतक्या महत्त्वाच्या काळात झालेला हा पक्षांतराचा निर्णय आगामी निवडणुकांवर परिणाम करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...