Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपिंपळगाव बसवंत नगराध्यक्षपदी भाजपचे डॉ. मनोज बर्डे विजयी

पिंपळगाव बसवंत नगराध्यक्षपदी भाजपचे डॉ. मनोज बर्डे विजयी

शिवसेना -१०, भाजपा -९ ,तर राष्ट्रवादी कॉंग्रेस( अजित पवार ) -७ जागांवर विजयी

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

- Advertisement -

पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या झाल्येल्या पहिल्या ऐतिहासिक नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. मनोज बर्डे ऐतिहासिक विजय मिळवत राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार इंजि.गोपालकृष्ण ( शरद )गायकवाड यांचा जवळजवळ पाच हजार मतांनी पराभव केला.

YouTube video player

डॉ. मनोज बरडे यांना १४ हजार ७९३ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार इंजि.गोपालकृष्ण ( शरद )गायकवाड यांना नऊ हजार ८८६ मते मिळाली तर राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार संतोष गांगुर्डे हे २ हजार २०१ इतके मते मिळवून पराभूत झाले. नगरसेवक पदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ९ जागांवर तर त्यांचे सहकारी शिवसेना (शंदे गट) ने १० जागांवर राष्ट्रवादी विजय मिळवला, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) ने ७ जागांवर विजय प्राप्त केला.

नगर सेवक पदासाठीच्या झालेल्या लढतीत प्रभागनिहाय निकाल खालील प्रमाणे

प्रभाग क्रमांक एक -भाजपाचे उमेदवार जोगारे ज्ञानेश्वर निवृत्ती ( ८८० ) आणि विधाते कल्पना राहुल ( ८७९) मते मिळवून विजयी झाले,तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे(अजित पवार गट) उमेदवार गायकवाड सुरेश मोतीराम ( ८५२ ) व खोडे जयश्री विनायक ( ८६० ) मते मिळवून पराभूत झाले.

प्रभाग क्रमांक दोन – शिवसेनेचे (शंदे गट) उमेदवार वाघ माणिक नामदेव ( १११० ) आणि मोरे श्वेता सत्यजित (११८७ ) मते मिळवून विजयी झाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार गांगुर्डे विष्णू वामन (५७३ ) पवार सुनिता मोतीराम, ( ५९५ )कॉंग्रेसचे उमेदवार पवार राहुल प्रभाकर( ११८) अपक्ष उमेदवार शेवरे गणेश हनुमंत (२४० ) व पीठे उर्मिला पंडीत ( २३० ) मते मिळवून पराभूत झाले. गणेश शेवरे आणि उर्मिला पीठे यांची अनामत जप्त झाली.

प्रभाग क्रमांक तीन- शिवसेन(शंदे गट) उमेदवार मोरे सुजित सुभाष ( १२१८ ) विधाते सोनाली दीपक ( १११५ )मते मिळवून विजयी झाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे(अजित पवार गट) उमेदवार मोरे दशरथ पंढरीनाथ ( ७७९ ) विधाते लता पुंडलिक ( ७८५ ) कॉंग्रेसच्या उमेदवार आहिरराव वृषाली संतोष ( ९४ )मते मिळवून पराभूत झाले.

प्रभाग क्रमांक चार – शिवसेनेचे(शंदे गट) उमेदवार रेखा किरण लभडे, ( १२१०) इमरान मुस्तफा कोतवाल (१२१७ ) मते मिळवून विजयी झाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार मोरे योगिता विक्रम (१०६८), भास्करराव नामदेवराव बनकर (१११३ ) आणि कॉंग्रेसच्या उमेदवार पुंड प्रियंका दीपक ( ५८) मते मिळवून पराभूत झाले. प्रियंका पुंड यांची अनामत जप्त झाली.

प्रभाग क्रमांक पाच- राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) उमेदवार दळवी अशोक भागोजी (१२८६ ), मोरे शितल विशाल (१३४३) मते मिळवून विजयी झाले तर भाजपाचे उमेदवार कराटे रवींद्र ज्ञानेश्वर (९३७ ), मोरे मंगला दिलीप (८७९) मते मिळवून पराभूत झाले.

प्रभाग क्रमांक सहा – शिवसेनेचे(शिंदे गट) उमेदवार गांगुर्डे सिंधू अशोक, (९०२ ) तौसिफ हरून मन्सुरी (९३४ ) मते मिळवून विजयी झाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार गांगुर्डे कावेरी सुनील ( ६८८ ), बागुल अमोल विलास (५७८ ) कॉंग्रेसचे उमेदवार भवर राजेंद्र छबू (४९ )अपक्ष उमेदवार गांगुर्डे नितीन अशोक ( ५३५) , ठाकरे सोनम दीपक (२६ ) , गांगुर्डे किरण फकीरा (४९३) मते मिळवून पराभूत झाले.

प्रभाग क्रमांक सात – भाजपाचे उमेदवार मोरे प्रशांत संपत (१२९१ ) , कायस्थ सीमा सचिन (११६९) मते मिळवून विजयी झाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे(अजित पवार गट) उमेदवार बनकर गीतेश तान्हाजी (७०२ ), बागुल सपना आशिष (८२४ ) मते मिळवून पराभूत झाले.

प्रभाग क्रमांक आठ – भाजपाचे उमेदवार वाघले सुवर्णा सुरेश( १२४७) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार बनकर राहुल अरुण (९७२ ) मते मिळवून विजयी झाले तर भाजपाचे उमेदवार काळे दत्तू माधव(९२६ ) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार मोरे शीतल दीपक, ( ११२०) अपक्ष उमेदवार आंबेकर सुनील (बाळासाहेब) केशव (६७), कुऱ्हाडे जयेश लक्ष्मण (४१६)मते मिळवून पराभूत झाले.

प्रभाग क्रमांक नऊ – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आहिरे भाऊसाहेब (महेश) बाबुराव ( ११९२), आणि जाधव सोनाली हर्षल ( १२१९ ) मते मिळवून विजयी झाले तर भाजपाचे उमेदवार खैरनार उत्तम सहादू (११०७ ), पारख प्रतिभा अल्पेश (११६२) कॉंग्रेसचे उमेदवार विधाते रेखा सोमनाथ ( २९)अपक्ष उमेदवार पगारे सचिन सुभाष ( ६८), सूर्यवंशी भारत ज्ञानेश्वर ( ४३) मते मिळवून पराभूत झाले.

प्रभाग क्रमांक दहा – भाजपाचे उमेदवार गांगुर्डे अनिता दत्तात्रय (२४६४), पाटील छाया राजेश (२७८८ ), मोरे सतीश साहेबराव (२७००) मते मिळवून विजयी झाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार मोगल यमुना भारत (८६५ ) पाटील (कोल्हे ) वर्षा विक्रम, (१०२८ ) मोरे निलेश रामराव (८९९ ) कॉंग्रेसचे उमेदवार महाले भय्यासाहेब काशिनाथ (१७७ ) अपक्ष उमेदवार दाभाडे सोनम सोमनाथ, ( ४६८) शेख फारुख रऊफ (४८) मते मिळवून पराभूत झाले. महाले आणि शेख यांची अनामत जप्त झाली .

प्रभाग क्रमांक अकरा – शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार पानपाटील मेघना सतीश (९३७), निलेश चंद्रकांत पाटील ( ८९९) मते मिळवून विजयी झाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे(अजित पवार गट) उमेदवार लोंढे विद्या संतोष(५०६) मोरे संजय रामराव (४७८ ) कॉंग्रेसचे उमेदवार चव्हाण रेखा अरुण (२५४) साळुंखे आकाश प्रकाश( २८५) अपक्ष उमेदवार शिरापुरे राजेश मुरलीधर ( २९) मते मिळवून पराभूत झाले. शिरापुरे यांची अनामत जप्त झाली.

प्रभाग क्रमांक बारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार वारडे अलका अंकुश (१०१९), बनकर गणेश अशोकराव (११०८ ) तर भाजपाचे उमेदवार घुटे जयाताई तानाजी ( १००१ ), घोडके चेतन(प्रशांत) हरिचंद्र (९२२ ) मते मिळवून पराभूत झाले.

पिंपळगाव बसवंतच्या सामान्य जनतेने नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष शिवसेना (शिंदे गट) युतीला घवघवीत यश देऊन गावाचा विकास करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल सर्व मतदारांचे कृतज्ञतापूर्वक आभार. अग्रक्रमाने गावच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. – सतीश मोरे नगरसेवक भाजपा नेते

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...