Saturday, November 16, 2024
Homeब्लॉगBlog : व्यावसायिक कौशल्ये वाढवा !

Blog : व्यावसायिक कौशल्ये वाढवा !

जॉब मार्केटमध्ये ट्रेंड वेगाने बदलत आहे. आता प्रोफेशनलपेक्षा व्होकेशनल (व्यावसायिक) कौशल्य असणार्‍या युवकांची मागणी अधिक आहे. चांगल्या नोकरीसाठी व्होकेशनल स्किल असणे गरजेचे आहे, ही बाब टीमलिजच्या एका सर्व्हेक्षणानुसार सिद्ध झाली आहे.

जर आपण एखाद्या टियर- 3 किंवा टियर-4 इन्स्टिट्यूटमधून एमबीए किंवा इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम करत असाल तर त्यावर चार ते दहा लाख रुपये खर्च करता. या ठिकाणी पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्याला चाळीस हजार रुपये वेतन मिळते. मात्र जर एखाद्या व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून एक लाख रुपयाच्या आतील अभ्यासक्रम पूर्ण केला तर 60 हजार रुपये दरमहा वेतन मिळू शकते. असे असेल तर आता तुम्हीच सांगा काय करायचे. आपण कमी मूल्याचा एमबीए किंवा इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा की मागणी असणारे इलेक्ट्रिशियन, लॅब टेक्निशियन किंवा जेमोलॉजिस्ट व्हायचे. देशात आता व्हाइट कॉलर जॉब संकुचित होत चालले आहेत त्यामुळे युवकांनी चांगल्या करियरसाठी व्होकेशनल्स कौशल्य अभ्यासक्रमावर भर देणे गरजेचे आहे.

- Advertisement -

व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमात वेतनवृद्धी ’टिमलिज’ केलेला सर्व्हे हा अनेक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो. उदा. एक जेमोलॉजिस्ट (रत्नशास्त्रज्ञ) हा पाच वर्षाच्या अनुभवानंतर 60 हजार रुपये दरमहा कमवू शकतो. नॉन टॉप टियर कॉलेजमधून इंजिनिअर किंवा एमबीए करणारा पदवीधारक एवढे वेतन सुरवातीच्या काळात मिळवू शकत नाही. तो तीन ते चार वर्षानंतर चाळीस हजार रुपये वेतन मिळवतो. लॅब टेक्निशियन, लायन्सस इलेक्ट्रिशियन, व्हिज्युअल मर्चेडायजर किंवा फॅशन डिझायनर हे आपल्या घरी दरमहा 60 हजार रुपये वेतन नेऊ शकतो. हा सर्व्हे टीम लीजच्या 2016,2017 आणि 2018 च्या स्थायी सॅलरी डेटाबेस आणि थर्ड पार्टी जॉब पोर्टलच्या सॅलरी डेटाबेसवर आधारित आहे. व्होकेशनल्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले कुशल कारागिरच्या सॅलरीची तुलना ही टॉप 50 इंजिनिअरिंग आणि एमबीए इन्स्टिट्यूटपासून निघालेल्या विद्यार्थ्याच्या सॅलरीशी केली जाते. इंजिनिअरिंग आणि एमबीए शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिळणारे वेतन हे तुलनेने कमीच मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.

महागड्या पदवीऐवजी कौशल्यविकास:
व्होकेशनल्स कर्मचार्‍यांनी वेतनाचा स्तर हा 8 वर्षाच्या अनुभवानंतर आणखी अधिक वाढल्याचे दिसून येते. व्हाइट कॉलर एम्प्लॉयमेंटमध्ये कनिष्ट दर्जाच्या संस्थेत नोकरी करणार्‍याच्या तुलनेत स्किल्ड व्होकेशनल्स जॉब करणार्‍या मंडळींना पंधरा वर्षात अधिक वेतन मिळत असल्याचे आढळून येते. आता व्हिज्युअल मर्चेडायजर, ऑटोमोबाइल्स सर्व्हिस टेक्निशियन, नेटवर्क टेक्निशियन आणि कंन्स्ट्रक्शन इंडिस्ट्रीत सर्व्हेवरला एखाद्या अभियंत्यापेक्षा अधिक पैसा मिळत आहे.

पारंपारिक लोकांची कमतरता :
आपल्याला मिळणारा पैसा हा मागणी आणि पुरवठ्याची झलक दाखवतो. देशात इंजिनिअरिंग ग्रॅज्यूएटस आणि एमबीएचा प्रमाणाबाहेर पुरवठा होत आहे. त्याचवेळी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणार्या कुशल कारागिरांची कमतरता भासत आहे. पुढील पाच वर्षात व्होकेशनल्स जॉब मार्केटमध्ये सुमारे सहा कोटी प्रशिक्षित लोकांची कमतरता भासणार आहे. जेम्स अँड ज्वेलरी सेक्टरच्या कंपनीला चांगले जेमोलॉजिस्ट हवे आहेत. कंपनी स्पेशालिस्ट ट्रेंड जेमोलॉजिस्ट हे चांगले पॅकेज देतात.

कौशल्याचा फटकाही :
अर्थात बहुतांश व्होकेन्शल्स स्किलची नकारात्मक बाजू पाहिल्यास विशिष्ट सेक्टरमध्येच नोकरी उपलब्ध होत असल्याचे दिसून येते. जर भविष्यात ट्रेंड बदलल्यास आपले कौशल्य वाया जावू शकते. त्याचवेळी टीमलीजच्या अंदाजानुसार 50 हून अधिक कमी रँकच्या इन्स्टिट्यूटमधून निघणारे 80 टक्के इंजिनिअर्सना नोकरी मिळत नसल्याचे चित्र आहे. 99 टक्के एमबीए पदवीधारक युवक हे देशात नोकरीसाठी भटकंती करत आहेत. अशावेळी व्यावसायिक अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो.

व्होकेशनल्सअभ्यासक्रमाचे महत्त्व वाढले :
व्यावसायिक कौशल्याची मागणी सध्या वाढली आहे. कोणत्याही एमबीए अभ्यासक्रमाच्या तुलनेत शून्य ते 2 वर्षाच्या अनुभवी व्हिज्युअल मर्चेटायजरला अ‍ॅपरेल इंडिस्ट्रीत अधिक पैसा मिळत असल्याचे दिसून येते. आपण त्याची तुलना अनभुवी इलेक्ट्रिकल इंजिनिअरशी करु शकता. व्हिज्युअल मर्चेडायजरला इलेक्ट्रिक इंजिनिअरपेक्षा अधिक पैसा मिळतो. कुशल इलेक्ट्रिशियनचे वेतन पाच वर्षाच्या अनुभवानंतर 27,250 रुपये दरमहावरुन 2018 मध्ये 39,500 वर पोचते. त्याचवेळी नेटवर्क टेक्निशियनचे वेतन 2016 मध्ये 38 हजार रुपये होते ते 2018 मध्ये 51,600 झाले. त्याचवेळी कनिष्ट दर्जाच्या महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडलेला युवक हा 2016 मध्ये 30,200 रुपये कमवत होता, तो 2018 मध्ये 40,500 रुपयांवर पोचला. याप्रमाणे इन्स्टिट्यूटमध्ये एमबीए केल्यानंतर 2016 मध्ये एका युवकाला 32,500 दरमहा मिळू लागले आणि हे वेतन 2018 मध्ये 42000 रुपये झाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या